वाई येथे दीपस्तंभाचे लोकार्पण उत्साहात

वाई, दि. 26 (प्रतिनिधी) – येथील दि वाई अर्बन को. ऑप. बॅंकेने छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभारलेल्या दीपस्तंभाचे लोकार्पण बॅंकेचे माजी अध्यक्ष डॉ. मुरलीधर पंडीत यांच्या हस्ते व वाईच्या नगराध्यक्षा डॉ. सौ. प्रतिभा शिंदे, बॅंकेचे अध्यक्ष सीए. सी. व्ही. काळे, उपाध्यक्ष राजेंद्र चावलानी, नगरसेवक चरण गायकवाड यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात करण्यात आले.
यावेळी डॉ. प्रतिभाताई शिंदे म्हणाल्या, वाई शहर सुशोभिकरण उपक्रमांतर्गत बॅंकेने चौकामध्ये आकर्षक अशा दीपमाळेची निर्मिती केलेली आहे. वाई शहराला मंदिरांची सास्कृतिक देणगी आहे. या परंपरेला साजेशी दीपमाळ बॅंकेने बांधली आहे. बॅंकेचे हे कार्य प्रशंसनीय आहे.
बॅंकेचे अध्यक्ष सीए. सी. व्ही. काळे म्हणाले, बॅंकेने सामाजिक बांधिलकीच्या माध्यमांतून व शहर सुशोभिकरण उपक्रमांतर्गत सुमारे 4 लाख रूपये खर्चून ही आकर्षक दीपमाळ बांधली आहे. त्यासाठी नगरपरिषदेनेही मोलाची मदत केली आहे. या जागेवर पूर्वी बॅंकेने पाण्याचे कारंजे बांधले होते. परंतु कालानुरूपे ते जीर्ण झाल्याने त्या जागेचे नूतनीकरण करणे आवश्‍यक होते.
कार्यक्रमास वाई अर्बन परिवाराचे प्रमुख अरूण देव, पोपटलाल ओसवाल, डॉ. सुधीर बोधे, प्रतापगड उत्सव समितीच्या निमंत्रक विजयाताई भोसले, बॅंकेचे माजी अध्यक्ष सीताराम जोशी, सतीश शेडे, भगवानदास शहा, मिलिंद भंडारे, नगरसेवक ऍड. श्रीकांत चव्हाण, राजेश गुरव, बाळासाहेब बागुल, सौ. वासंती ढेकाणे, सौ. रूपाली वनारसे, किसनवीर कारखान्याचे संचालक प्रवीण जगताप, दिलीप पिसाळ, अजित वनारसे, विठ्ठल माने, नितिन जगताप, उपअभियंता श्रीपाद जाधव व मान्यवर उपस्थित होते. बॅंकेचे संचालक मदनलाल ओसवाल, ऍड. प्रतापराव शिंदे, विवेक भोसले, ऍड. सीए. राजगोपाल द्रवीड, विद्याधर तावरे, मनोज खटावकर, प्रा. विष्णू खरे, भालचंद्र देशपांडे, डॉ. शेखर कांबळे, स्वरूप मुळे, सीए. किशोरकुमार मांढरे, संचालिका सौ. अंजली शिवदे, सीईओ श्रीपाद कुलकर्णी, उपसरव्यवस्थापक चंद्रशेखर काळे, संतोष बागुल आदींनी स्वागत केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)