वाई तालुक्‍यात ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचा वरचष्मा

वाई, दि. 27 (प्रतिनिधी) – वाई तालुक्‍यातील सात ग्रामपंचायतीत झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत यशवंतनगर, वेळे, पाचवड, शहाबाग, चांदवडी, अमृतवाडी ग्रामपंचायतीमध्ये तुल्यबळ निवडणुका होवून सात पैकी चार ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीने निर्विवाद सत्ता स्थापन केली. तर दोन ग्रामपंचायतीत राष्ट्रीय कॉंग्रेसने यश मिळविले आहे.
लक्षवेधी ठरलेल्या यशवंतनगर ग्रामपंचायतीत राष्ट्रीय कॉंग्रेस, भाजप, आरपीआय, शिवसेना, यांच्या यशवंत महाविकास आघाडीला धूळ चारत राष्ट्रवादी पुरस्कृत यशवंतनगर ग्रामसमृद्धी पॅनलने 16-0 असा दणदणीत पराभव केला. शहाबाग ग्रामपंचायतीत आठ उमेदवारांना निवडून आणत राष्ट्रवादीने कॉंग्रेसला धुळ चारली. वेळे ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीने माजी जिल्हा परिषद सदस्य शशिकांत पवार यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसच्या ताब्यात असलेली ग्रामपंचायत 9-1 ने दारुण पराभव करीत विजय संपादन केला. पाचवड ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी व कॉंग्रेस पुरस्कृत असणाऱ्या सर्व पक्षीय पाचवड विकास महाआघाडीने राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या ग्रामपंचायतीत सत्तांतर करीत विजय संपादन केला. चांदवडी ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीची सत्ता होती त्याठिकाणी सत्तांतर होवून ही पंचायत कॉंग्रेसच्या ताब्यात गेली आहे. अमृतवाडीत राष्ट्रवादीला सत्ता राखण्यात यश आले. तर धोम (पु.) ग्रामपंचायत आधीच बिनविरोध झाली असल्याने पुन्हा एकदा वाई तालुक्‍यात झालेल्या सात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने वर्चस्व मिळवीत चार ग्रामपंचायतीत यश खेचून आणले. तर एका ठिकाणी सत्तांतर करण्यात कॉंग्रेसला यश आले तर एका ग्रामपंचायतीत सर्व पक्षीय सत्ता आली.
ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विचाराचे सरपंच निवडुन आल्याने वर्चस्व राहिले. तर अंतर्गत गटबाजीचा फटका पाचवड ग्रामपंचायतीत बसला. ग्रामपंचायतीतील सरपंच पदाच्या निवडणुकीत विजयी उमेदवार पुढील प्रमाणे कंसात त्यांना मिळालेली मते. यशवंतनगर ग्रामपंचायत-सरपंच-निखील भीमराव सोनावणे, सदस्य- आनंदा साठे, सुरेखा भिसे, तारावती माने, विजय शेडगे, कोंडीबा सावंत, विजय भोसले, मेघा लोणकर, कुंडलिक सावंत, लक्ष्मी लंकेश्वर, ऋतुजा सावंत, बिनविरोध- मेघा सावंत, योगेश लाखे, सुवर्णा गाडे, वैशाली गायकवाड, दिलीप मदने, शहाबाग – सरपंच – सारिका नारायण मोरे, सदस्य – किरणकुमार जमदाडे, शुभांगी जमदाडे, रचना ननावरे, रवींद्र कोरडे, यशवंत जमदाडे, संगीता राजापुरे, मोहन खरात, मंदाकिनी जमदाडे, दिपाली भोरे, पाचवड- सरपंच – अर्चना नितीन विसापुरे, सदस्य – अजित शेवाळे, वर्षा जंगम, तुषार सपकाळ, रेश्‍मा गायकवाड, संध्या गायकवाड, दिनेश मोरे, कमलाकर गायकवाड, मालन गायकवाड, संतोष गायकवाड, पुष्पा धर्माधिकारी, लता जाधव, वेळे – सरपंच – रफिक रसूल इनामदार, सदस्य – संतोष गायकवाड, रफिक इनामदार, सविता पवार, संतोष नलावडे, शुभांगी डेरे, शीतल पवार, स्वप्ना पवार, स्वप्नील कांगडे, रोहिणी भिलारे, चांदवडी – सरपंच – जयदीप दिलीप शिंदे, सदस्य – भिकू कांबळे, यमुना काकडे, नरेश वाघ, सुनिता शिंदे, संभाजी कुऱ्हाडे, नंदा शिंदे, व बिनविरोध – शांताबाई कुंभार, अमृतवाडी – सरपंच – उषा जयसिंग बाबर, सदस्य – आनंदराव हगवणे, जावेद पटवेकर, दत्तात्रय बांदल, विश्वास निकम, बिनविरोध – आरती जाधव, शशिकला साळुंखे, पूजा यादव, निर्मला नलावडे, रुपाली शिंदे, धोम (पु.)- बिनविरोध सरपंच – विष्णू लक्ष्मण शिंदे, बिनविरोध सदस्य – सचिन पोळ, सोनाली शिंदे, शोभा उभे, जयश्री चव्हाण, सुरेखा कांबळे, नम्रता पोळ, बाळकृष्ण शिर्के, इत्यादी सरपंच व सदस्य पदाचे उमेदवार विजयी झाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)