वाईमध्ये बेंदूर डॉल्बीच्या दणक्‍यात

वाई ःबैलांच्या सजावटीमध्ये तुझ्यात जीव रंगला, राणादा, लागीर झालं जी, फौजी, झिंगाट, एक मराठा लाख मराठा, अशी वाक्ये बैलांच्या अंगावर सुबक रंगात आकर्षक पध्दतीने रंगवली होती.

श्रमदेवतेचे आपल्या विकृत मनोरंजनासाठी केली जाते पिळवणूक
वाई, दि. 25 (प्रतिनिधी) – आपल्या संस्कृतीत बेंदूर सणाचे मोठे महत्व आहे. बैल म्हणजे श्रम म्हणजेच कष्ट….. अशा कष्ट करणा-या देवतेची पुजा, म्हणजेच जो दुस-यासाठी श्रम करतो अशा श्रमदेवतेची पुजा करण्याचा हा दिवस…. बैलांचे शेतक-यांवर अनंत उपकार असतात व तो ते उपकार फेडू ही शकत नाही. म्हणून कृज्ञता व्यक्‍त करण्यासाठी बेंदूर हा सण आत्मीयतेने बळीराजा साजरा करतो. परंतू वाई शहरात या प्रतिमेला व पावित्र्याला फाटा दिल्याचे दिसत आहेत. वास्तविक पाहता कष्ट करणा-या बैलांचा सन्मानार्थ बेंदूर सणानिमित्त त्याची भक्‍ती भावाने स्नान घालून विधिवत पुजा करून विविध प्रकारच्या रंगाने व सजावटीच्या साहित्य वापरून सजविले जातात. गावातून त्यांची सवाद्य , भक्‍तीभावाने मिरवणूक काढली जाते ही खरी प्रथा आहे. परंतू याला काही ठिकाणी आपल्या किळसवाण्या मनोरंजनासाठी फाटा देत शकडो वर्षांची परंपरा मोडीत काढत बैलांचा आदर करण्याऐवजी त्यांची डॉल्बीच्या कांठळ्या बसवणाऱ्या आवाजाने छळवणूक होताना दिसत आहे.यांत्रिकीरणाच्या काळात बैलांची संख्या सर्वत्र दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. वाई शहरात बैलांच्या मिरवणुकीत बैल कमी व डॉल्बीच्या तालावर नाचणारे सैराट कार्यकर्ते जास्त असे विदारक चित्र पहावयास मिळत होते. वाईच्या किसनवीर चौकात वाडीवस्तीवरून आलेल्या बैलांना पाहण्यासाठी तोबा गर्दी केली होती. त्यामुळे चौकाला यात्रेचे स्वरूप आले होते. वाई पोलिस प्रशासनाने गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

डॉल्बीमुळे सणांना, उत्सवांना येतयं बकाल स्वरूप
वास्तविक पाहता सणांना, उत्सवांना आपल्या आपल्या परंपरेमध्ये असणारी विविध वाद्यांना संस्कृतित महत्व आहे. मिरवणुकीत पारंपरिक वाद्येच वापरावीत अशी आपेक्षा आहे. परंतू अलिकडच्या काळात पारंपरिक वाद्य हद्दपार होऊन त्याची जागा डॉल्बीने घेतल्याने सामाजिक स्वास्थ बिघडत आहे.आजारी,वृध्दांना होणारा त्रास विचारात घेतला जात नाही.मद्यपान करून बेधुंद अवस्थेत बैलांसमोर नाचणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)