वर्षभरात 5,803 रोप दगावली

पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागाच्या वतीने वर्षभरात शहराच्या विविध भागांमध्ये एकूण 69 हजार 455 रोपे लावण्यात आली होती. त्यापैकी विविध कारणांमुळे 5 हजार 803 रोपे दगावली आहेत. तर उर्वरित 54 हजार 551 रोपे जिवंत असल्याचा दावा या विभागाने केला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वृक्षप्राधिकरण समितीचे सन 2018-19 चे सुधारित आणि सन 2019-20 चे मूळ अंदाजपत्रक असे एकूण 28 कोटी 67 लाख 16 हजार रुपयांच्या अंदाजपत्रकास स्थायी समितीने आज मान्यता दिली. सभापती ममता गायकवाड सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. गेल्या आठवड्यातील स्थायीच्या सभेत हे अंदाजपत्रक तहकूब करण्यात आले होते. शहरातील वृक्षारोपणाबाबतची माहिती सभागृहाला सादर केल्याशिवाय या अंदाजपत्रकाला मान्यता न देण्याची भूमिका स्थायी समिती सदस्यांनी घेतली होती. त्यानंतर महापालिकेच्या उद्यान विभागाने ही आकडेवारी सादर केल्यानंतर या विषयाला मंजुरी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापालिकेच्या एकूण आठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत वृक्ष प्राधिकरण उद्यान विभाग, दुर्गादेवी टेकडी, मेट्रोमार्फत केलेले वृक्षारोपण, रोपवाटीकेतून वितरित केलेली रोपे, हौसिंग सोसायट्या व लष्करी हद्दतील वृक्षारोपणाचा समावेश आहे. महापालिकेच्या उद्यान विभागाला वर्षभरात एकूण 60 हजार रोपे लावण्याचे उद्दीष्ट ठरवून देण्यात आले होते. मात्र, या विभागाच्या वतीने शहराच्या विविध भागांमध्ये एकूण 69 हजार 455 रोपे लावण्यात आली होती. ही सर्व रोपे जगविण्याची जबाबदारी उद्यान विभागाची होती. त्यानुसार या सर्व रोपांना वेळेवर पाणी दिले जात होते.

लष्कराच्या हद्दीत प्रमाण अधिक
वृक्षारोपणासाठी शहरात असलेल्या लष्कराच्या विविध ठिकाणच्या मोकळ्या जागांमध्ये वर्षभरात एकूण 35 हजार रोपे लावण्यात आली होती. त्यापैकी 30 हजार 753 रोपे जगली. तर 4 हजार 247 रोपे दगावली. लष्करी हद्दीत चालणाऱ्या शस्त्र सरावामुळे या भागात झाडे दगावण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचा निष्कर्ष या अहवालात नमूद केला आहे. रोपे जगण्याचे हे प्रमाण सरासरी 87.86 टक्के एवढी आहे.

रोपे दगावण्याची कारणे
वृक्षारोपणानंतरत्यांना वेळेवर पाणी देण्याची जाबबादारी उद्यान विभागाची असली, तरीदेखील काही नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटांमुळे रोपे दगावली आहेत. त्यामध्ये स्थापत्य विभागाच्या वतीने केले जाणारे रस्ता रुंदीकरण, पादचारी मार्ग, ड्रेनेज लाईनच्या कामातील रोपे, वाहने पार्क करताना, व पाण्याअभावी या मानव निमित संकटांबरोबरच आग, नदीला आलेला पूर व मोकाट जनावरांच्या वावरामुळे ही रोपे दगावल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)