वर्धापनदिनाच्या पूर्वसंध्येला पालिकेत सन्नाटा

सातारा, दि. 31 (प्रतिनिधी) –
बुधवारी सातारा पालिका 166 वा वर्धापनदिन साजरा करत असताना पुर्वसंध्येला पालिकेत दुपारी चक्‍क सन्नाटा होता. स्पर्धेच्या निमित्ताने एकूण पावणेपाचशे कर्मचाऱ्यांपैकी एकवीस कर्मचारी बायोमेट्रिक यंत्रणेला टाळून गायब झाल्याचे समोर आले. जन्म मृत्यू विभागातही कर्मचारी अपवादानेच असल्याने नागरिकांना दाखल्यांसाठी पुन्हा हेलपाटे मारण्याची वेळ आली. सातारा पालिकेचा 1 ऑगस्ट रोजी साजरा होणारा वर्धापनदिन सत्ताधाऱ्यांच्या इच्छाशकतीच्या अभावामुळे रूटीन छापाचा झाला आहे. विविध गुणदर्शन, धावण्याच्या चालण्याच्या स्पर्धा अथवा किल्ले आरोहण स्पर्धा यापलीकडे सातारा विकास आघाडीची बुध्दी जाईनाशी झाली आहे. या संपूर्ण सोहळ्यात सर्वसामान्य सातारकर अजिबात नसल्याने वर्धापनदिन साजरा करण्याचा चार्म निघून गेला आहे. मंगळवारी सकाळी चालण्याच्या स्पर्धत एकोणतीस कर्मचाऱ्यांनी भाग घेतला. मात्र नगरसेवकांना या स्पर्धामध्ये अजिबात स्वारस्य नव्हते. नगरसेविका सविता फाळके यांचा अपवाद वगळता भाजप नगर विकास आघाडी कोणीच पालिकेकडे फिरकले नाही. रंगीत तालमीच्या नावाखाली दोन तृतीयांश कर्मचारी शाहू कला मंदिरमध्ये तळ देवून बसल्याने सातारा पालिकेत दैनंदिन कामाचा चांगलाच खोळंबा झाला. सभासचिव राजेश काळ चक्‍क रजेवर लेखापाल उदयनराजेंच्या सूचनेनुसार थेट पुण्याला रवाना झाले तर मुख्याधिकारी शंकर गोरे नेहमीप्रमाणे गायबं असल्याने सातारा पालिका दुपारी बारा वाजल्यापासूनच ओसं पडली होती. पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर यांचा अपवाद वगळता कोणी सभापती सुध्दा पालिकेकडे फिरकलेच नाही.
बायोमेट्रिकला ठेंगा
सातारा पालिकेत बहुतांश कर्मचारी नियमातून सटकण्याचा प्रयत्न करतात. एकूण पावणेसहाशे कर्मचारी असताना सतत पालिकेत कर्मचाऱ्यांचा तुटवडा जाणवतो. वर्धापनदिनाच्या पूर्वसंध्येला साधारण पंधरा ते अठरा कर्मचारी गायब असल्याचे लक्षात आले. पण वचक ठेवणारी यंत्रणाच नसल्याने कोणी कोणाला थांबवायचे हा प्रश्न निर्माण झाला. वर्धापनदिन हा उपचार बनला असेल तर तो साजरा कशासाठी करायचा? आणि ज्या सातारकरांसाठी ही सातारा पालिका आहे ते या वर्धापन दिन सोहळ्यात का नाही ? असे खडसावण्याची वेळ आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)