वर्धनगड येथे लहुजी शक्ती सेना संघटनेची शाखा स्थापन

पुसेगाव – वर्धनगड, ता. खटाव येथील संतोष उर्फ बापू दादासाहेब खवळे यांची खटाव तालुका लहुजी शक्ती सेना संघटनेच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. वर्धनगड येथे या संघटनेच्या शाखेचीही स्थापना करण्यात आली. या संघटनेचे उद्‌घाटन श्री. खवळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संघटनेच्या नामफलकाचे अनावरण वर्धनगडचे सरपंच अर्जुन मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले.

लहुजी शक्ती सेनेची ताकद आता गावखेड्यापासून राष्ट्रीय स्तरावर पोहोचली आहे. मातंग समाजाचे विविध प्रश्‍न या संघटनेच्या माध्यमातून सोडविण्यात येणार आहेत. वर्धनगड येथील मातंग समाजाच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न सरपंच व वर्धनगड ग्रामपंचायतीने मार्गी लावावा, अशी मागणी नूतन तालुकाध्यक्ष संतोष खवळे यांनी यावेळी केली. संघटनेच्या खटाव तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास सरपंच अर्जुन मोहिते, उपसरपंच हुसेनभाई शिकलगार, ग्रामस्थ व संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी वर्धनगड संघटनेच्या शाखाप्रमुखपदी संतोष पांडुरंग खवळे यांची, अध्यक्षपदी सुधीर हनुमंत खवळे, उपाध्यक्षपदी दत्ता मल्हारी खवळे, खजिनदारपदी सचिन यशवंत खवळे, सचिवपदी आप्पा पांडुरंग खवळे यांची तर दिलीप धोंडीबा खवळे यांची सल्लागारपदी आणि राजेश खवळे यांची संपर्कप्रमुखपदी निवड करण्यात आली.

वर्धनगड शाखेचे अध्यक्ष सुधीर खवळे म्हणाले, मातंग समाजाच्या हितासाठी, एकीसाठी, समाजाच्या विकासासाठी ही संघटना कार्य करणार आहे. सरपंच अर्जुन मोहिते म्हणाले, मातंग समाजातील तरुणांनी एकत्र येऊन ही जी मुहूर्तमेढ रोवली आहे, ती फक्त फलकापुरतीच मर्यादित न राहता त्याद्वारे समाज हिताचे व जनकल्याणाचे भरीव कार्य साध्य व्हावे. येथील मातंग समाजाच्या विकासासाठी सरपंच या नात्याने आपले पुर्ण सहकार्य राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)