वर्ग-1 अधिकाऱ्यांच्या जागा पदोन्नती, बदलीने भराव्यात

नोंदणी व मुद्रांक विभाग राजपत्रित अधिकारी संघनटनेची महसूलमंत्र्यांकडे मागणी

पुणे- नोंदणी व मुद्रांक विभागाचे सेवा प्रवेश नियम हे एप्रिल-2015 मध्ये शासनास सादर करण्यात आले आहेत. यामध्ये महानिरीक्षक तथा मुद्रांक अधीक्षक, नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक, सहजिल्हा निबंधक वर्ग-1 या पदांवर विभागातील पात्र अधिकाऱ्यांच्या पदोन्नती किंवा बदलीने भरण्यात यावी, अशी मागणी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे नोंदणी व मुद्रांक विभाग राजपत्रित अधिकारी संघनटनेने केली आहे.

नोंदणी व मुद्रांक विभागाने 2017-18 या वर्षात शासनाने दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक महसूल गोळा केला, यासंदर्भात महसूलमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अधिकारी संघनटेने महसूलमंत्र्यांकडे विविध प्रलंबीत मागण्यांसंदर्भात निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे, सह दुय्यम निबंधक यांना वर्ग-1 अधिकाऱ्यांना पूर्वलक्षी प्रभावाने पदोन्नती देण्यात यावी.

सद्यस्थितीत या विभागात तालुकास्तरावर कार्यरत असलेले काही दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये गट ब दुय्यम निबंधक श्रेणी- म्हणून कार्यरत आहेत त्याऐवजी या पदांना तालुकस्तरीय कार्यालय प्रमुख म्हणून गट ब दुय्यम निबंधक वर्ग-2 अशी श्रेणी वाढ देण्यात यावी. त्याचबरोबर नोंदणी कायद्यामध्ये नोंदणी अधिकाऱ्यांने नोंदविलेल्या दस्तांच्या अनुषंगाने तो खरा, खोटा नियमबाह्य असा ठरविण्याचा अधिकार हा केवळ दिवाणी न्यायालयास आहेत. पोलिस विभागाकडून फौजदारी केसेस नोंदणी अधिकाऱ्यांवर दाखल केले जातात.

अशा प्रकारे अधिकारी व कर्मचारी यांना वेठीस धरण्याचा प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत, ते त्वरीत थांबवण्याच्या अनुषंगाने शासन स्तरावरून आदेश देण्यात यावेत. दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये नोंदणीकृत दस्तऐवजांची संगणक प्रणालीच्या “आय-सरिता’मध्ये उपलब्ध असलेली मराठी भाषेतील माहिती आहे त्यास्वरूपात न स्वीकारता इंग्रजी भाषेमध्ये अन्य नमुन्यांमध्ये आयकर विभागाकडून मागणी केली जाते. त्याला विलंब झाला तर दंड केला जातो, त्यामुळे अशे प्रकार थांबणे आवश्‍यक असल्याचे अधिकारी संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)