वरुण धवन गर्लफेंडबरोबर लंडनच्या दौऱ्यावर

अन्य सेलिब्रिटीपेक्षा वरुण धवनच्या पर्सनल लाईफबाबत गॉसिप फॅक्‍टरी शांतच असते. त्याच्या कामावर त्याने अधिक लक्ष केंद्रीत केलेले असल्याने पर्सनल लाईफबाबत तो विशेष चर्चेला वावच देत नाही. स्वतःच्या पर्सनल रिलेशनशीपबाबत तो जास्ती बोलतही नाही. गेल्या वर्षी त्याने आपली गर्लफ्रेंड नताशा दलालचा उल्लेख मिडीयासमोर केला होता.

नताशा अगदी नॉर्मल मुलगी आहे. ती नेहमीच लाईम लाईटपासून दूर राहिलेली आहे, असे वरुण धवन म्हणाला. मात्र त्यानंतर तो कधीही मिडीयासमोर नताशाला आणतही नाही. आपल्या पर्सनल लाईफमध्ये कोणाचा हस्तक्षेप त्याला आवडत नाही. नाही तर पर्सनल आणि पब्लिक लाईफमध्ये काही फरकच राहणार नाही. सध्या हे दोघेजण लंडनच्या दौऱ्यावर फिरायला गेले असल्याचे समजते आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या दोघांनाही एकमेकांबरोबर वेळ घालवताना बघितले गेले आहे. काहीवेळेस या दोघांबरोबर रोहित धवन आणि त्याची पत्नीही असतात. वरुण धवनचा “ऑक्‍टोबर’ काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला आणि त्यातील वरुणच्या कामाचे कौतुकही केले गेले. सध्या तो “कलंक’चे शुटिंग करतो आहे. त्यानंतर लगेचच त्याचा “सुई धागा’ही रिलीज होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)