वरुण धवनला अनुष्का शर्माने दिल्या हटके शुभेच्छा…

बॉलिवूड अभिनेता वरुण धवनचा आज ३१ वा वाढदिवस आहे. २०१० मध्ये जोहरच्या स्टुडेंट ऑफ द ईअर या सिनेमातून त्याने बॉलिवूडमध्ये पर्दापण केले. यानंतर वरुणने ११ सिनेमात काम केले. त्याची खासियत म्हणजे त्यातील एकही सिनेमा फ्लॉप ठरला नाही. वाढदिवसानिमित्त सेलिब्रेटींनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. तर अनुष्का शर्माने एक खास ट्वीट करत वरुणला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

वरुण-अनुष्काचा सुईधागा हा नवा सिनेमा येऊ घातला आहे. या सिनेमातील एक फोटो शेअर करत अनुष्काने वरुणला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोत अनुष्का-वरुण एका बसमध्ये हसत उभे आहेत. दोघेही अत्यंत साध्या सिंपल लूकमध्ये दिसत आहेत. या ट्वीटमध्ये अनुष्काने लिहिले की, वरुण धवनला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तू आसपास असताना मी आनंदी वाटते आणि तुझ्यासोबत काम करणे नेहमी आनंद देते. हॅप्पी बर्थडे सर्वांचा प्यारे मौजी.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)