वरवरा राव हैदराबादेत नजरकैदेत

हैदराबाद – माओवाद्यांशी संबंध असल्याच्या कथित आरोपावरून पुणे पोलिसांनी अटक केलेले तेलगू कवी आणि लेखक वरवरा राव यांना हैदराबादमध्ये त्यांच्या घरी नेण्यात आले. त्यांना त्यांच्याच घरी स्थानबद्ध ठेवण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यालयाने 28 ऑगस्ट रोजी दिलेल्या निर्देशांनुसार अटक केलेल्या पाचही जणांना 6 सप्टेंबरपर्यंत स्थानबद्ध ठेवण्यात येणार आहे.

राव यांना आज सकाळी विमानाने हैदराबादेत आणण्यात आले. राव यांच्या घरामध्ये मुली आणि जावई यांच्याशिवाय अन्य कोणालाही प्रवेश नाकारण्यात येत आहे, असे राव यांच्या पत्नी हेमलता यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. प्रसिद्धी माध्यमांशी बोलण्यासही राव यांना मज्जाव करण्यात आला आहे. राव यांच्या स्थानबद्धतेबाबतची व्यवस्था हैदराबाद पोलिसांच्यावतीने केली जात असल्याचे पोलिस उपायुक्‍त विश्‍व प्रसाद यांनी सांगितले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राव यांच्या स्थानबद्धतेची व्यवस्था पुणे पोलिस बघणार की हैदराबाद पोलिस याबाबत थोडी गैरसमजूत निर्माण झाली होती. मात्र पुणे पोलिसांना पूर्ण सहकार्य केले जाईल, असे चिक्कडपल्लीचे पोलिस निरीक्षक एस. भीम रेड्डी यांनी सांगितले.

राव यांना हैदराबादमध्ये तर वेरनॉन गोन्सालविस आणि अरुण फरेरा यांना मुंबईमध्ये अटक करण्यात आली होती. व्यापारी संघटनेचे कार्यकर्ते सुधा भारद्वाज यांना हरियाणातील फरिदाबादमधून आणि नागरी हक्कविषयक कार्यकर्ते गौतम नवलखा यांना नवी दिल्लीत अटक करण्यात आली होती. 31 डिसेंबर रोजी झालेल्या “एल्गार’ परिषदेशी संबंधित असल्यावरून या पाचही जणांना अटक करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)