वरवंड येथे एसटी फोडली

वरवंड- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शुक्रवारी (दि. 27) रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान (वरवंड, ता. दौंड) गावाच्या हद्दीत पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गवर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आक्रमक आंदोलकांनी एसटी बसवर दगडफेक केल्यामुळे बसच्या काचा फुटल्या आहेत. यामध्ये बसचे चालक जखमी झाले आहेत. या प्रकरणी यवत पोलिसांनी 35 ते 40 आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत.
सकल मराठा समाजाच्या वतीने शुक्रवारी महामार्गावर आंदोलन करण्यात आले. यावेळी दोन्ही लेनवर टायर व लाकडी ओंडके पेटविण्यात आले. तसेच दगड आडवे लावून रास्ता रोको आंदोलन केले गेले. यावेळी दौंड आगाराची एसटी बस (एमएच 12 ईएफ 6733) बारामतीवरून दौंड तालुक्‍यातील चौफुला येथे चालली होती. योवळी आंदोलकांनी बसवर दगडफेक केली. या दगडफेकीत एसटीच्या काचा फुटून 60 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. यामध्ये बसचे चालक जखमी झाले आहेत.
एसटीचे चालक जगन्नाथ कृष्णराव खराडे (वय 54, रा. हिंगणीगाडा, ता. दौंड, जि. पुणे) यांनी अज्ञात आंदोलकांविरोधात यवत पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राहुल यादव करीत आहेत.

  • एसटीचे चालक, वाहकाचे प्रसंगावधान
    जमावाने वरवंड येथे बसवर दगडफेक करण्यास सुरवात केली. यावेळी बसचे चालक जगन्नाथ कृष्णराव खराडे आणि वाहक मोरे यांनी बसमधील प्रवाशांना सीटखाली झोपण्यास सांगितले. यामुळे आंदोलकांनी फेकलेले दगड प्रवाशांना लागुन दुखापत झाली नाही, अशी माहिती एसटी बसचे चालक जगन्नाथ कृष्णराव खराडे यांनी दिली.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)