वनौषधी उद्यानाची जबाबदारी जनसेवा दत्त आश्रमाकडेच द्यावी

ऍड. सागर चरण यांची मागणी ः पूर्वकल्पना न देता दुसऱ्या संस्थेला दिली जबाबदारी
पिंपरी – महापालिकेच्या आयुर्वेद वनौषधी उद्यानाची जिम्मेदारी जनसेवा दत्त आश्रमाकडेच ठेवण्यात यावी, अशी मागणी महापालिका आरोग्य विभाग तक्रार निवारण समिती उपाध्यक्ष व सदस्य हरित सेना वन विभाग, महाराष्ट्र शासनचे ऍड. सागर चरण यांनी केली आहे.

याबाबत ऍड. चरण यांनी मनपा आयुक्‍तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे भोसरी एम.आय.डी.सी मध्ये आयुर्वेद वनौषधी उद्यान आहे. या उद्यानाची देखरेख, विकास व संरक्षण करण्यासाठी महापालिकेने जनसेवा दत्त आश्रमाकडे जबाबदारी दिली आहे. त्यासाठी महापालिकेमार्फत अंशत: अनुदान देण्यात येते. परंतु, संबंधित संस्थेला कोणतीही पूर्वकल्पना न देता महापालिकामार्फत दुसऱ्या कुठल्यातरी संस्थेला अनुदान तत्वावर या उद्यानाची जबाबदारी सोपविली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सदर उद्यान जनसेवा दत्त आश्रमाचे वैद्य मारूती जाधव सांभाळत आहेत. सन 1997 पासून हे उद्यान विकसित करण्यात आले आहे. यामध्ये जाधव यांनी सुमारे साडेचारशेहून अधिक विविध प्रकारची वनौषधी, वृक्ष, झुडूप, वृक्षवर्गीय व वेलवर्गीय वनस्पती, अनेक प्रकारचे कंद, तसेच ठराविक ऋतुतच वाढणाऱ्या अनेक वनौषधी वनस्पती, दुर्मिळ वनस्पतींची लागवड करून जपली आहे.

या सर्व वनस्पती, वृक्ष, विविध कंदमुळे या उद्यानामध्ये नागरीकांना पाहण्यासाठी आजही उपलब्ध आहे. जाधव गुरूजी दर बुधवारी गुरूकुल पद्धतीने लोकांना औषधी वनस्पती व वृक्ष लावण्याबाबतचे प्रशिक्षण देतात. त्याचप्रमाणे राष्ट्रीय पातळीवरही वनौषधीच्या प्रसाराचे कार्य करत असून रुग्णांना नाममात्र दराने आणि गरजू लोकांना मोफत वनऔषधोपचार करतात. सध्या आयुष्य मंत्रालयामार्फत सरकार आयुर्वेदिकला चालना देत आहे. मनपाने महाराष्ट्र शासनचे धोरणावर विसंगत असा निर्णय घेऊ नये व नियमाच्या अनुषंगाने उचित निर्णय घेण्यात यावा. त्यामुळे इतकी वर्षे उद्यान सांभाळणाऱ्या आणि सेवाभावी वृत्तीने काम करणाछया मारूती जाधव गुरूजी यांच्या जनसेवा दत्त आश्रम या संस्थेकडेच उद्यानाची जिम्मेदारी ठेवण्यात यावी, दुसछया संस्थेला देण्यात आलेला ठेका रद्द करावा, अशी मागणी ऍड. सागर चरण यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)