वनहक्क दाव्याबाबत लवकरच निर्णय

मंचर- फलोदे (ता. आंबेगाव) येथील वनहक्क दावा लवकरच मंजूर केला जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.
शेतमजूर युनियन, किसान सभा व सिटू संघटनेच्या शिष्टमंडळाने पुणे जिल्हाधिकारी यांची नुकतीच भेट घेवुन आदिवासी वनाधिकार कायदे विषयक सकारात्मक चर्चा केली. शिरूर तालुक्‍यातील सुमारे 48 वैयक्तिक वनदावे त्वरीत मंजूरी करण्याबाबत उपविभागीय अधिकारी यांना सूचित केले. त्यामुळे आदिवासी कष्टकरी कुटूंबाना त्यांच्या हक्काची जमीन मिळण्याच्या प्रक्रियेला गती प्राप्त झाली आहे.
यावेळी रोजगार हमी कायद्याच्या अंमलबजावणी विषयक चर्चा झाली. तळेघर (ता.आंबेगाव) येथील स्टेट बॅंक नियमित सुरू रहावी, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली. या समस्या सोडविण्यासाठी संबंधिताना सूचित केले जाईल, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. शिष्टमंडळात कामगार नेते अजित अभ्यंकर, किसान सभेचे अध्यक्ष ऍड. नाथा शिंगाडे, वसंत पवार, डॉ. अमोल वाघमारे, डॉ. ज्ञानेश्वर मोटे आदी सहभागी होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)