वधु-वर परिचय मेळाव्यात शिरूरमध्ये 500 जणांची नोंदणी

शिरूर-शिरूर येथे संत रविदास महाराज जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. यावेळी आयोजित केलेल्या वधु-वर परिचय मेळाव्यात 400 ते 500 वधु-वरांनी नोंदणी केल्याची माहिती संत रविदास जयंती उत्सव समितीने दिली.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी अतिरेकी हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर संत रविदास महाराज व छञपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार शिरुर-हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे, नगराध्यक्षा वैशाली वाखारे व मान्यवरांच्या हस्ते अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यानंतर वधु-वर परिचय मेळावा घेण्यात आला. यामध्ये सुमारे 400-500 वधु-वरांनी नाव नोंदणी केली. या कार्यक्रमाला सिनेअभिनेते काळुराम ढोबळे, सिनेअभिनेत्री तेशवानी वेताळ, एकनाथ अडसूळ, संजय गांधी योजनेचे अध्यक्ष श्रीकांत सातपुते, जनता दलाचे नाथाभाऊ शेवाळे, चर्मकार संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, लेखक-ज्येष्ठ समीक्षक बाळासाहेब काकडे, लोकशाही क्रांती आघाडीचे रविंद्र धनक, मनसेचे जिल्हाउपाध्यक्ष मेहबुब सय्यद, डॉ. गवारी, विजय पोटे आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संत रविदास महाराज जयंती उत्सव समितीचे तुषार वेताळ, योगेश गवळी, सागर गायकवाड आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.