वणवा लावणाऱ्या महिलेवर कारवाई

वनविभाग “कंपार्टमेंट 30′ क्षेत्रातील पाच हेक्‍टर क्षेत्र जळून खाक

वाई – चांदक, ता. वाई येथे राखीव वनक्षेत्रात लागलेल्या वणण्यास जबाबदार असणाऱ्या चांदक येथील महिलेवर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी गुन्हा दाखल करून कारवाई केली.याबाबत वनविभागाकडून मिळालेली माहिती अशी, चांदक, ता. वाई येथे रंजना संपत खामकर यांनी आपल्या शेताच्याजवळील कळकाच्या बेटातील पाला-पाचोळा जाळण्यासाठी आग लावली. ती आग त्यांच्या नियंत्रणाच्या बाहेर जावून शेजारील वनविभागाच्या कंपार्टमेंट 30 या राखीव क्षेत्रात लागून पाच हेक्‍टर क्षेत्र जळून खाक झाले. याची माहिती वनपाल सदानंद राजापूरे, वनरक्षक वसंत गवारी, सुरेश सुर्यवंशी, वनमजूर संजय चव्हाण यांनी धाव घेवून राखीव वनक्षेत्रास लागलेली आग त्वरीत विझवली.

या घटनेचा अधिक तपास केला असता रंजना खामकर यांनीच आग लावल्याचे सिध्द झाल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. अधिक तपास वनक्षेत्रपाल महेश झांजुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सदानंद राजापुरे करीत आहेत. दरम्यान, तालुक्‍यात कोणीही आग लावू नयेत अन्यथा कडक कारवाई केली जाईल अशी माहिती वनक्षेत्रपाल महेश झांजुर्णे यांनी दिली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)