वडूजला रंगला शालेय कुस्ती स्पर्धेचा थरार

वडूज, दि. 28 (वार्ताहर) – येथील हुतात्मा परशुराम विद्यालयात शालेय कुस्ती स्पर्धा उत्साहात पार पडल्या. 14 वर्षेखालील वयोगटातील मल्लांनी नेत्रदिपक लढती करत कुस्तीशौकिनांची मने जिंकली.
वडूज तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी तालुक्‍यातील अनेक कुस्ती शौकिनांनी हजेरी लावली होती. सकाळी नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष विपुल गोडसे यांच्या हस्ते आणि नगरसेवक शहाजीराजे गोडसे, डॉ. महेश गुरव, अभय देशमुख, जयवंत पाटील, उपप्राचार्य मिलिंद घार्गे, राजेंद्र पवार, विजय शिंदे आयोजक राजेंद्र जगदाळे यांच्या उपस्थितीत आखाड्याचे पूजन करून स्पर्धेला सुरुवात झाली. शालेय कुस्ती स्पर्धेत वर्षाखालील, वर्षाखालील मुलांच्या विविध वजन गटात अतिशय रंगतदार अशा लढती झाल्या. यंदा प्रथमच हुतात्मा परशुराम विद्यालयाचे क्रीडा शिक्षक आणि कुस्ती समालोचक राजेंद्र जगदाळे यांनी वडूजला यंदा शालेय कुस्ती स्पर्धा घेण्यासाठी पुढाकार घेतला होता. नेटके नियोजन केल्यामुळे कुस्तीशौकीन आणि पालक यांनी समाधान व्यक्त केले. 14 वर्षाखालील 32, 35, 41 किलो वजन गटातील लढती चांगल्याच रंगल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)