वडापुरी येथे मोहरमनिमित्त ताबुताची मिरवणूक

रेडा- वडापुरी (ता. इंदापूर) येथे गेली दहा दिवस सुरू असलेल्या मोहरमची सांगता ताबूत विसर्जन करून करण्यात आली. ताबूतची मिरवणूक गावातून काढण्यात आली होती, यावेळी दर्शनासाठी गावातील व वाड्यावस्त्यांवरील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वडापुरी येथे मुस्लिम बांधवांच्या वतीने जामा मस्जिदच्या प्रांगणात सवारी व ताबूत बसविण्यात आले होते. या वर्षी मोहरम व गणेश उत्सव एकत्र आल्याने गावातील वातावरण भक्‍तीमय झाले झाले होते. मौलाना निसार शेख यांनी दुवा पठण करून ताबूत व सवारी यांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी प्रसाद म्हणून सर्व भाविकांना लंगर सह सरबत वाटप करण्यात आले. यावेळी वडापुरी, अवसरी, पंधारवाडी पिंगळेवस्ती, राजगुरूवस्ती, राऊतवस्ती या ठिकाणावरून मोहरमच्या डोले व सवारीचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)