वडापुरीत अंबाजी-लिंबाजी यात्रा उत्साहात

रेडा- वडापुरी (ता. इंदापूर) येथील अंबाजी-लिंबाजी देवस्थानच्या यात्रेला यंदाही पाच राज्यातील भाविकांनी हजेरी लावत, आपल्या नवसाची गुळाची शेरणी वाटप करीत, छब्बीना पालखीवर गुलालाची उधळण करीत दर्शनाचा लाभ घेतला. अंबाजी – लिंबाजी देवाच्या यात्रेनिमित्त सकाळी मंदिरापासून छबिना, पालखी व झेंडे निशान आदींची मिरवणूक काढण्यात आली होती. गुलालाची उधळण करून एकमेकांना पेढे-फुटाणे वाटून यात्रेला सुरुवात करण्यात आली. यावेळी नंदीवाले समाजातील लोक मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी झाले होते. गेल्या 300 वर्षांपासून या यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजरात, राजस्थान येथून भाविकांचा दर्शनासाठी येत असता यंदाही ते आले होते. यात्रेच्या दिवशी गोड नैवेद्य देखवून त्याचा प्रसादरुपी अस्वाद भाविकांनी घेतला. तसेच ज्यांनी-ज्यांनी नवस बोलले होते, ते आपल्या वजना एवढे पेढे, गुळ, साखर, नारळ, शेरणी आदींचे वाटप करण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)