वडगाव काशिंबेत अंगारक चतुर्थीनिमित्त गर्दी

मंचर- वडगाव काशिंबेग (ता. आंबेगाव) येथे अंगारक चतुर्थीनिमित्त हजारो भाविकांनी गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करीत दर्शनासाठी दिवसभर रांगा लावल्या होत्या. श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग (ता. आंबेगाव) येथील श्री स्वयंभू मोरया अर्धपीठ गणपती देवस्थान येथे अंगारक चतुर्थीनिमित्त विविध धार्मिक उपक्रम पार पडले. पहाटे महापूजा त्यानंतर अभिषेक, आरती झाली. त्यानंतर भाविकांनी दर्शनाला सुरुवात केली. मंचर येथील श्री विठ्ठल-रुक्‍मिणी पारायण मंडळाच्या 51 वारकऱ्यांनी पारायण केले. दुपारी तीन वाजता आरती झाली. सायंकाळची महाआरती मान्यवरांच्या उपस्थितीत झाली. या पेशवेकालीन मंदिरावर फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. पावसाळी दिवस असल्याने दर्शनरांग, तसेच मंदीर परिसरात मंडप टाकण्यात आला होता. देवस्थानच्या वतीने भाविकांसाठी थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. गर्दीवर नियंत्रण रहावे यासाठी सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले होते. दरम्यान मंदिर परिसरात सुसज्ज वाहन व्यवस्था वाहनतळ करण्यात आल्याने पार्किंगची समस्या मार्गी लागली होती. रात्री चंद्रोदयानंतर नैवद्य दाखवण्याचा कार्यक्रम झाला. मंदिराच्या पायथ्याशी बॅरीकेड्‌स लावून केलेल्या दर्शनरांगेमुळे भाविकांना सुलभतेने दर्शन घेता आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)