वडगाव-कातवी नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण राखीव

वडगाव मावळ – वडगाव-कातवी नगरपंचायतीच्या नवनिर्मित नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सोडत नगरविकास राज्यमंत्री कार्यालय (मुंबई) येथे बुधवारी (दि. 30) झाली वडगाव-कातवी नगरपंचायतीचे नवनिर्मित नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी राखीव झाल्याने इच्छुकांनी आनंदोत्सव साजरा केला.

वडगाव-कातवी नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक जून 2018 मध्ये जाहीर होणार असून, प्रभाग व आरक्षण 13 एप्रिल रोजी जाहीर झाले. इच्छुक उमेदवारांची उत्सुकता केवळ नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाकडे लक्ष होते. वडगाव-कातवी नगरपंचायतीचा प्रथम नगराध्यक्ष होण्यासाठी इच्छुकांची संख्या वाढली आहे. त्यात अनेक इच्छुकांनी गेल्या सहा महिन्यांपासून विकास कामांचा धडाका सुरु केला आहे. तर काहींनी नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची प्रतीक्षा करत होते. आता इच्छुक उमेदवारांची प्रतीक्षा संपली असून, केवळ निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रत्येक जण पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुक असून, मीच योग्य उमेदवार असल्याचे सिद्ध करत आहे. त्यात नाराजांनी उमेदवारी मिळत नसल्याने पक्षांना राम राम ठोकून दुसऱ्या पक्षात जात आहेत. भाजप व आरपीआय प्रणीत परिवर्तन पॅनल व कॉंग्रेस व राष्ट्रवादी प्रणीत शहर विकास समिती यांच्यात सत्तांतर झाले. प्रत्येक उमेदवार मतदारांच्या भेटीगाठी घेत आहे.

नगरसेवक पदासाठी काहींनी मतदानाची गोळा बेरीज केली असून, मतदारांसाठी मनोरंजनात्मक तसेच समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत. काहींनी मोफत देवदर्शन घडविले. प्रत्येकजण पक्षाचे तिकीट कोणाला मिळणार याकडे लक्ष ठेवून आहेत. प्रचार कामाला वेग आला आहेत. आता प्रचाराची चुरस वाढली आहे. प्रत्येक पक्ष उमेदवारांची चाचपणी करत आहे. भाजप व आरपीआय संयुक्तपणे वडगाव-कातवी नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. राष्ट्रवादी, कॉंग्रेस आदी पक्षांच्या प्रचाराचा नारळ कधी फुटणार याची चर्चा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)