वडगावपीरच्या सरपंचपदी मीरा पोखरकर

धामणी- वडगावपीर (ता. आंबेगाव) येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत पिरसाहेब ग्रामविकास पॅनलच्या मीरा संजय पोखरकर विजयी झाल्या आहेत.

पिरसाहेब ग्रामविकास पॅनलेचे तीन वॉर्डातील पाचही उमेदवार निवडून आले आहेत. तसेच दोन जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. विजय उमेदवार पुढील प्रमाणे – वॉर्ड क्रमांक एक – रविंद्र जालिंधर गुळवे, अलका कैलास आदक (बिनविरोध). वॉर्ड क्रमांक दोन – किसन बाबूराव साबळे, अनिता रामदास शिंदे, संगिता पांडुरंग साबळे (बिनविरोध), वॉर्ड क्रमांक तीन – अण्णासाहेब दत्तात्रय पोखरकर, निलम विठ्ठल आदक. या पॅनलचे नेतृत्व सरपंच संजय पोखरकर, रमेश आदक, दिलीप पोखरकर, विश्वनाथ साबळे, तुकाराम आदक, मछिंद्र आदक, फकिर आदक, पोपट राजगुडे, सावळेराम आदक यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.