वकिलांमध्ये “302′ क्रमांकाची क्रेझ

या क्रमांकाची वाहने, शेवटी तीन अक्षरे असलेला मोबाईल घेण्यास पसंती

विजयकुमार कुलकर्णी
पुणे – राजकीय नेत्यांमध्ये अनेक वर्षांपासून लकी नंबरची क्रेझ आहे. निवडून आलेल्या मतांचा आकडा, जन्म तारखेचा अथवा अन्य कारणामुळे आपल्या वाहनांना लकी नंबर मिळावा म्हणून तीन हजार रुपयांपासून अगदी लाखोंच्या घरात फी भरल्याची अनेक उदाहरणे शहरात आहेत. स्वत:ला भाई, दादा, भाऊ, युवा नेता म्हणून मिरवून घेणाऱ्यांचे प्रमाण यात लक्षणीय आहे. हीच क्रेझ आता वकिलांमध्ये निर्माण झाली आहे. विशेषत: शेवटी 302 असलेला मोबाईल क्रमांक, याच क्रमांकाची गाडी घेण्यास वकील पसंती देत आहेत.
दिवाणी, फौजदारी स्वरूपाच्या केसेसमध्ये वकील प्रॅक्‍टीस करतात. फौजदारीमध्ये भारतीय दंड संहिता कलम 302 (खून) हे प्रसिध्द आहे. वकिलांसोबत पक्षकार, सर्वसामान्य नागरिकांनाही याबाबत माहिती आहे. त्यामुळे हा वाहन क्रमांक, शेवटी तीन अक्षरे असलेला मोबाईल क्रमांक घेण्यास वकील पसंती देत आहेत. याविषयी ऍड. विजयसिंह ठोंबरे म्हणाले, भारतीय दंड संहितेतील हे गंभीर स्वरूपाचे कलम आहे. फौजदारी क्षेत्रात प्रॅक्‍टीस करणाऱ्या वकिलांना याच्या केसेस चालवाव्या लागतात. या कलमाबाबत वकील, पक्षकार, सर्वसामान्यांना माहिती आहे. हा क्रमांक लक्षात ठेवण्यास सोपा आहे. ही गाडी वकिलांची आहे, हे सर्वांना सहजपणे समजते. त्यामुळे गाड्यांना हा क्रमांक घेतला असून, मोबाईलची शेवटची तीन आकडेही हेच आहेत. तर, ऍड. विपीन बिडकर म्हणाले, खूनाच्या खटल्याचे काम पाहणारे वकील, अशी ओळख निर्माण झाल्यानंतर मी तीन चारचाकी आणि एक बुलेट गाडी या क्रमांकाची घेतली. तर ऍड. भालचंद्र पवार म्हणाले, मी सांगलीमध्ये वकिलीचा अभ्यासक्रम शिकत होतो. त्यावेळी भविष्यात फौजदारीमध्ये प्रॅक़्टीस करायची, म्हणून शेवटी 302 असलेला क्रमांक घेतला. आता पुण्यामध्ये प्रॅक्‍टीस करतानाही तोच मोबाईल क्रमांक वापरत आहे.

चॉईस नंबरसाठी मोजतात लाखोंची रक्कम

कोणत्याही व्यक्तीला चॉईस नंबर हवा असल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) शुल्क आकारले जाते. चारचाकी गाडीला चाईस नंबर घेण्यासाठी तीन हजार रुपयांपासून सुरूवात होते. अनेकदा एकाच नंबरवर दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींनी दावा केल्यास ही रक्कम लाखो रुपयांपर्यंत जाते. शेवटी, हा नंबरसाठी लिलावाच्या माध्यमातून जास्त पैसे देणाऱ्यांना नंबर वितरीत केला जातो. तर, दुचाकीसाठीही अशीच प्रक्रीया असून, नंबर घेण्यासाठी चढाओढ असते. दरम्यान, अशा प्रकारामुळे आरटीओला मोठा महसुल मिळत असून, एखदा चाईस नंबरची किंमत तब्बल 12 लाखापर्यंत गेल्याची नोंद आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)