वंजारवाडीत सव्वातेरा लाखांचा मुद्देमाल जप्त

बारामती – मोटारीतून होणाऱ्या दारू वाहतूकीवर बारामती तालुका पोलिसांनी कारवाई केली. या घटनेत मोटारीसह पोलिसांनी 32 हजार रुपयांची दारू असा 13 लाख 32 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वंजारवाडी गावच्या हद्दीत एका हॉटेलसमोर ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी दिली. विनोद कांतीलाल पवार (रा. सावळ, ता. बारामती) व निरज भारत पीसे (रा. बारामती) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. यातील विनोद पवार याला पोलिसांनी अटक केली आहे. तर पोलिस कर्मचारी नंदू जाधव यांनी फिर्याद दिली आहे. दरम्यान, पोलिसांनी या कारवाईत 16 हजार रुपयांच्या देशी सिमला संत्रा नावाच्या 384 बाटल्या तसेच टॅंगो पंच नावाच्या 16 हजार रुपयांच्या 48 बाटल्या व 13 लाख रुपये किमतीची मोटार (एमएच-42, एए-9954) जप्त करण्यात आली. मोटारीतून मधून हा माल नेला जात होता. तर पिसे यांच्या मालकीची ही मोटार असल्याचे फिर्यादित नमूद केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.