लौकी शाळा दुरुस्तीसाठी साडेसात लाखांचा निधी

मंचर -आंबेगाव तालुक्‍यातील लौकी येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा दुरुस्तीसाठी साडेसात लाख रुपये मंजूर झाले आहेत, अशी माहिती सभापती उषाताई कानडे यांनी दिली.
लौकड शाळेतील चार वर्ग खोल्यांची दुरवस्था झाली होती. शाळा परिसर दुरुस्ती आणि वर्ग खोल्यांची दुरुस्ती लवकारात लवकर व्हावी, अशी ग्रामस्थांची व शाळेची आग्रही मागणी होती. जिल्हा परिषद सर्व शिक्षा अभियनांतर्गत शाळा दुरुस्तीसाठी पाच लाख रुपये मंजूर करण्यासाठी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या सदस्या तुलसीताई भोर यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्याकडे पाठपुरावा केल्याने शाळा दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाला आहे. सभापती कानडे यांच्या शिफारशीतून शाळेच्या दुरुस्तीसाठी पंचायत समिती शिक्षण विभागांतर्गत अडीच लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. तसेच अंगणवाडीचे काम पुर्ण झाल्याबद्‌ल शालेय शिक्षण समिती, मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. या कामासाठी सातत्याने ग्रामस्थांच्या वतीने पाठपुरावा करण्याचे काम शिष्टमंडळाच्या माध्यमातून लौकी ष्ट्रवादी युवकचे कॉग्रेस अध्यक्ष निलेश थोरात, उपसरपंच गजाबा थोरात, ग्रामविकास समिती अध्यक्ष राजेंद्र थोरात, उद्योजक जयवंत थोरात, सुदाम काळे, सागर पडवळ, स्वप्निल काळे, विलास थोरात यांच्यासह ग्रामस्थांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.