लोहारे येथे हजारो बियांचे रोपण

लोहारे ः बियांचे रोपण करताना शालेय विद्यार्थी व मान्यवर.

पर्यावरण संवर्धनासाठी कृषीविभागाचा उपक्रम
वाई, दि. 26 (प्रतिनिधी) – पर्यावरणाच्या रक्षणासाठी वृक्षारोपण व त्यांचे संवर्धन करणे ही आज काळाची गरज आहे. बेसुमार वृक्षतोड, बेसुमार पाण्याचा वापर, पाणी सिंचनाविषयीचे अज्ञान, डोंगरांना वणवा लावणे यामुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास हा जलद गतीने होत असताना, लोकांच्या अज्ञानातून डोंगरांना वणवा लावला जातो. यासाठी मोठ्या प्रमाणात झाडांचे वृक्षारोपण करणे व त्यासाठी लागणारे बीजरोपण, हे अभियान हाती घेवून पर्यावरणासाठी पूरक असणारे देशी बियांचे बिजरोपण करण्यात यावे, असे प्रतिपादन उपविभागीय कृषी अधिकारी जयवंतराव कवडे यांनी लोहारे (ता. वाई) येथे देशी बियांच्या झाडांचे बीजरोपण कार्यक्रमात बोलताना केले.
यावेळी तालुका कृषी अधिकारी हरिश्‍चचंद्र धुमाळ, लोहारे सरपंच मनीषाताई गुरव, मेणवली मंडल कृषी अधिकारी सुनील घनवट, कृषी सहाय्यक भीमराव राऊत, कृषी पर्यवेक्षक विठ्ठलराव जाधव, शिक्षण समिती अध्यक्ष संदीप भोईटे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शेखर जाधव, ग्रामपंचायत सदस्य, लोहारे ग्रामस्थ यांची प्रमुख उपस्थिती होती.
लोहारे येथे राबविण्यात आलेल्या वृक्ष बिजरोपण कार्यक्रमात गावातील सर्वच शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. यावेळी लोहारे गावांतील उजाड डोंगरावर हजारो झाडांचे बिजरोपण करण्यात आले. सुरुवातीला मेणवली मंडल कृषी अधिकारी सुनील घनवट यांनी शाळेतील मुलांना नैसर्गिक साधनसंपत्ती, श्वसनासाठी उपयुक्त ऑक्‍सिजनचे कार्य आणि वृक्षारोपण यांचे अमुल्य नाते विषयी सखोल मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी हरिश्‍चचंद्र धुमाळ यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजना, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, कोटी वृक्षलागवड यांची माहिती दिली. यावेळी लोहारे गावाच्या डोंगरावर चिंच, पेरू, सीताफळ, आवळा, जांभूळ, या झाडांच्या हजारो बियांचे बिजरोपण करण्यात आले. लोहारे ग्रामपंचायतीच्या सहकाऱ्याने वाई तालुका कृषी विभागाने वृक्षारोपण व देशी बियांचे बिजरोपण कार्यक्रम आयोजित केला होता. कृषी विभागातील सहाय्यक प्रशांत सोनावणे, सुरेश जाधव, हरिश्‍चचंद्र लांडगे, कांतीलाल गावित, गणेश बनसोडे, श्री. वाघ यांनी विशेष परिश्रम घेतले. कृषी सहाय्यक नितीन धुमाळ यांनी उपस्थितांचे आभार मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)