लोहाच्या कमतरतेमुळे होणाऱ्या अॅनिमियाची लक्षणं

पुरुषांमध्ये लोहाचं प्रमाण शंभर मिलिलीटर रक्तात 13.5 ते 18.0 ग्रॅमच्या दरम्यान, तर स्त्रियांमध्ये लोहाचं प्रमाण शंभर मिलिलीटर रक्तात 11.5 ते 16.5 ग्रॅमच्या दरम्यान असलं पाहिजे.

मात्र ,रक्तातील लोहाचं प्रमाण 10 ग्रॅमहून कमी होतं तेव्हा थकवा जाणवणं, हृदयाची धडधड वाढणं, धाप लागणं, श्‍वास लागणं आणि चक्कर येणं ही लक्षणं बहुतांश रुग्णांमध्ये दिसतात.

याच्या जोडीला –
केस गळणं, त्वचा निस्तेज, ओठ फाटणं, गिळताना त्रास होणं याही प्रकारचे त्रास अॅनिमियामुळे होतात.

अॅनिमियाचा त्रास असणाऱ्या मुलांमध्ये मनाची एकाग्रता कमी होते. मुलांची बौद्धिक तसंच मानसिक वाढ खुंटते.

दीर्घकाळ अॅनिमिया असेल तर घशाची जळजळ वाढते. घशाला कोरडही पडते. स्त्रियांमध्ये मासिकपाळीच्या वेळीही त्रास होतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)