लोहमार्ग न्यायालयात हजर केला बनावट आरोपी

रेल्वे सुरक्षा बलाच्या एका कर्मचाऱ्यासह एकाच्या विरोधात गुन्हा दाखल

दौंड- दौंड लोहमार्ग प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर बनावट आरोपी हजर करून न्यायालयाची फसवणूक केल्याप्रकरणी रेल्वे सुरक्षा बलाच्या एका कर्मचारी व मूळ आरोपी यांच्याविरोधात दौंड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याबाबत प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी रेल्वे कोर्टचे सहाय्यक अधीक्षक गणेश यशवंत राऊत (रा. पुणे) यांनी न्यायाधीशांच्या आदेशाने फिर्याद दाखल केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, 8 जुलै रोजी संक्षिप्त फौजदारी खटला क्रमांक 2225 /2019 कलम 145 बी आणि 146 रेल्वे कायदा (रेल्वेतील वातानुकूलित कोचमध्ये गोंधळ घातलेबाबत व रेल्वे तिकीट परीक्षक यांना मारहाण केले बाबत) अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याबाबत 13 ऑगस्ट रोजी रेल्वे सुरक्षा बलाचे लोंढे हे एका व्यक्तीस दौंड लोहमार्ग न्यायालयात घेवून आले.

त्या व्यक्तीला न्यायालय यांचे समक्ष हजर केले असता सदरची व्यक्ती ही बोगस असल्याची बाब न्यायाधीश यांच्या लक्षात आल्यानंतर न्यायाधीशांनी त्यांच्यासमोर हजर केलेल्या व्यक्तीला त्याचे कोणतेही एक ओळखपत्र दाखविण्यास सांगितले, परंतु हजर केले व्यक्तीने त्याचे ओळखपत्र दाखविण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे न्यायालयाने सदर व्यक्तीस तुरुंगात पाठवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर 14 ऑगस्ट रोजी रेल्वे न्यायालयाने संक्षिप्त खटला क्रमांक 2225/2019 मध्ये निशाणी एक वर आदेश पारित करून सरकार तर्फे दौंड पोलीस स्टेशन या ठिकाणी फिर्याद दाखल करण्याचे आदेश दिले.

त्याप्रमाणे फिर्यादी गणेश राऊत हे दौंड पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी गेले असता पोलीस निरीक्षक बंदोबस्तासाठी बाहेर असल्याने फिर्याद दाखल झाली नाही. मात्र, शनिवारी (दि. 17) फिर्याद दाखल करण्यात आली. यानुसार रेल्वे सुरक्षा बल दौंड एस.एस. लोंढे व मूळ आरोपी इंद्रजीत महादेव यादव (रा. बालाजीनगर, दौंड) यांच्या जागी बनावट आरोपीस हजर करून न्यायालयांची फसवणूक करून कागदपत्रांमध्ये फेरफार केले आहेत, अशी दोघांविरोधात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील महाडिक करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)