लोया प्रकरणात पीआयएल दाखल करणारी व्यक्ती आरएसएसशी निगडित – सिब्बल

नवी दिल्ली – सोहराबुद्दीन शेख एन्काऊंटर केसची सुनावणी करणारे विशेष कोर्टाचे जज बी.एच. लोया यांच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करणारी जनहित याचिका एक ढोंग होते, असे काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी म्हंटले आहे. सिब्बल म्हणाले की, जज लोया यांच्या प्रकरणात पीआयएल दाखल करणारी व्यक्ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (आरएसएस) संबंधीत होती. हे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचावे हाच उद्देश याचिका दाखल करण्यामागे होता .याचिका दाखल करण्यामागे राजकारण असल्याचं सुप्रीम कोर्टचे निरीक्षण योग्य असल्याचंही त्यांनी म्हंटल आहे.

सिब्बल म्हणाले याप्रकरणात कोणतीच कायदेशीर कारवाई झाली नाही, याचे दुःख आहे. ते म्हणाले, ज्या व्यक्तीने पीआयएल दाखल केली होती. त्याचे नाव सूरज लोळगे आहे. तो नागपूरचा रहिवासी आहे, सिब्बल यांचा आरोप आहे की सूरज भाजप आणि आरएसेसशी संबंधीत आहे. त्याने स्थानिक निवडणुकीत भाजपकडून तिकीट मिळावे यासाठी अर्जही केला होता.सरकार म्हणते की देश बदलत आहे, मात्र आम्ही म्हणतो की देश बदलला आहे. आज सरकारचा न्यायव्यवस्थेसोबतचा व्यवहार संपूर्ण देश पाहात आहे. जस्टिस जोसेफ यांना सुप्रीम कोर्टात न्यायाधीशपदी नियुक्ती देण्याची सरकारची इच्छा नसल्याची टीकाही त्यांनी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)