लोपेझचा वॉवरिन्कावर सनसनाटी विजय

क्‍विटोव्हा, कीज, ओसाका यांची विजयी सलामी


फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा

पॅरिस – स्पेनचा बिगरमानांकित खेळाडू गुलेर्मो गार्सिया लोपेझने स्वित्झर्ळंडच्या 23व्या मानांकित स्टॅनिस्लास वॉवरिन्कावर पाच सेटच्या कडव्या झुंजीनंतर मात करताना येथे सुरू असलेल्या फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतील दुसऱ्या दिवशीचा सर्वाधिक खळबळजनक निकाल नोंदविला.

रॉजर फेडरर व अँडी मरे यांच्या गैरहजेरीत राफेल नदालला विजेतेपदासाठी पसंती देण्यात येत असताना त्याला रोखण्याची क्षमता असलेल्या खेळाडूंमध्ये वॉवरिन्काचा समावेश होता. परंतु लोपेझने वॉवरिन्काचे आव्हान 6-2, 3-6, 4-6, 7-6, 6-3 असे मोडून काढताना विजयी सलामी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्याच वेळी आठवी मानांकित पेट्रा क्‍विटोव्हा, 13वी मानांकित मॅडिसन कीज, 21वी मानांकित नाओमी ओसाका आणि 23वी मानांकित कार्ला सुआरेझ नवारो या मानांकितांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर वेगवेगळ्या शैलीत मात करताना महिला एकेरीत विजयी सलामी दिली. याशिवाय लारा आरुआबारेना व कॅमिला गिओर्गी या बिगरमानांकित महिला खेळाडूंनीही दुसऱ्या फेरीत स्थान मिळविले. तसेच बेनॉइट पायरे, अर्नेस्ट गल्बिस, मार्को ट्रन्गेलिटी व केरेन खाचानोव्ह या पुरुष खेळाडूंनीही चमकदार विजयांची नोंद करताना दुसऱ्या फेरीत धडक मारली.

महिला एकेरीत आठव्या मानांकित पेट्रा क्‍विटोव्हाने केपेले रॉयगविरुद्ध पहिला सेट गमावल्यानंतर झुंजार पुनरागमन करताना 3-6, 6-1, 7-5 अशा विजयासह दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. तेराव्या मानांकित मॅडिसन कीजने अमेरिकेची गुणवान उदयोन्मुख खेळाडू साचिया व्हिकरीचा 6-3, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. जपानच्या 21व्या मानांकित नाओमी ओसाकाने अमेरिकेच्या सोफिया केनिनचा 6-3, 7-5 असा पराभव करीत विजयी सलामी दिली.
तसेच 23वी मानांकित कार्ला सुआरेझ नवारोने ऍना कोन्जुहचा 6-0, 6-1 असा फडशा पाडला. लारा आरुआबारेनाने तिमिया बाबोसचा 7-6, 6-3 असा धुव्वा उडविला. तर कॅमिला गिओर्गीने जी मिनचे आव्हान 6-3, 6-2 असे परतवून लावत दुसरी फेरी गाठली. तर झेक प्रजासत्ताकाच्या कॅटरिना सिनियाकोव्हाने व्हिक्‍टोरिया आझारेन्काचे आव्हान 7-5, 7-5 असे पहिल्याच फेरीत संपुष्टात आणले.

पायरे, ट्रन्गेलिटी, गल्बिस दुसऱ्या फेरीत
पुरुष एकेरीत बेनॉइट पायरेने कारबालेस बाएनाचा 6-3, 6-7, 7-6, 6-1 असा संघर्षपूर्ण लढतीत पराभव करीत दुसऱ्या फेरीत धडक मारली. दुसान लाजोव्हिचने यिरी व्हेसेलीचा 6-3, 6-1, 6-3 असा पराभव केला. तर अर्जेंटिनाच्या बिगरमानांकित मार्को ट्रन्गेलिटीने बर्नार्ड टॉमिकला 6-4, 5-7, 6-4, 6-4 असे पराभूत केले. केरेन खाचानोव्हने हैदर मॉररचा प्रतिकार 7-6, 6-3, 6-3 असा मोडून काडत विजयी सलामी दिली. आणखी एका चुरशीच्या सामन्यात अर्नेस्ट गल्बिसने जाईल्स म्युलरची झुंज 2-6, 6-4, 6-4, 6-3 अशी संपुष्टात आणताना दुसरी फेरी गाठली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)