लोणी देवकरच्या छत्रपती इंडस्ट्रियलला जर्मनीच्या तज्ज्ञांची पाहणी

रेडा- इंदापूर तालुक्‍यातील लोणी देवकर येथील औद्योगिक वसाहतीत छत्रपती इंडस्ट्रियल लिमिटेड कंपनीला जर्मनीच्या तज्ज्ञांनी भेट देऊन कंपनीची पाहणी केली. अद्ययावत साधनसामुग्री निर्मिती करण्यासाठी जर्मनीच्या टीमने होकार दिला आहे. जर्मनी येथील एसएमएस ग्रुपचे फ्रांक मुलर, मंदार देशमुख या मुख्य रचनाकार पाच सदस्यांच्या टीमने छत्रपती इंडस्ट्रियल कंपनीची पाहणी केली, कंपनीचे संस्थापक अध्यक्ष अशोक कुलकर्णी, कार्यकारी संचालक नितेश कुलकर्णी, प्रशासन मंडळाने टीमचे स्वागत केले. एसएमएस ग्रुपच्या माध्यमातून भारतामध्ये अद्ययावत टेक्‍नॉलॉजी वापरून साधनसामुग्री निर्मिती करावयाची आहे.

यासाठी छत्रपती इंडस्ट्रियल परिपूर्ण काम करू शकते, असा आशावाद फ्रांक मुलर यांनी व्यक्‍त केला. सध्या छत्रपती इंडस्ट्रियल पेट्रोलियम इंडस्ट्रीजचा अद्ययावत बॉयलर क्रेन, अशी सामुग्री तयार करण्यामध्ये हातखंडा म्हणून कंपनीचा नावलौकिक आहे. याच कामाची हातोटी पाहून थेट जर्मनी येथील नावाजलेल्या एसएमएस ग्रुपने सोबत काम करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे छत्रपती इंडस्ट्रियलचा लौकीक वाढला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)