लोणी काळभोर हद्दीतील सर्व व्यवहार बंद

लोणी काळभोर- मराठा क्रांती मोर्चाने केलेल्या हवेली बंदच्या आवाहनाला नागरिकांनी आज (दि. 30) लोणी काळभोर आणि कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील सर्व व्यवहार बंद ठेवून चांगला प्रतिसाद दिला. या परिसरांच्या हद्दीत व्यापाऱ्यांना गाव बंद ठेवण्याचे आवाहन युवकांनी केले होते. व्यावसायिकांनी या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे लोणी काळभोर आणि कदमवाकवस्ती ग्रामपंचायतींच्या हद्दीतील सर्व व्यवहार आज (दि. 30) बंद होते. मात्र, पुणे-सोलापूर महामार्ग सुरळीतपणे सुरू होता, तसेच आरोग्य सेवाही सुरळीतपणे सुरू होती.
पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलिसांनी दिवसभर चोख बंदोबस्त ठेवला होता. एक पोलीस निरीक्षक, दहा सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक दर्जाचे आधिकारी, शीघ्र कृती दलाच्या तीन तुकड्या, पंधरा पुरुष आणि दहा महिला पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे वीस जवान असा चोख बंदोबस्त यावेळी ठेवण्यात आला होता. महामार्गावरील वाहतूक सुरळीत रहाण्यासाठी फिरती गस्त पथके तैनात करण्यात आली होती, त्यामुळे यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)