लोणी काळभोरमध्ये बंदच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद

लोणी काळभोर – मराठा क्रांती मोर्चाने केलेल्या महाराष्ट्र बंदच्या आवाहनाला नागरिकांनी आज (दि. 25) दिवसभर लोणी काळभोर बंद ठेवून प्रतिसाद दिला. यावेळी लोणी काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या हद्दीत युवकांनी एक रॅली काढली. या युवकांनी व्यावसायिकांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. व्यावसायिकांनी या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला, त्यामुळे दिवसभर लोणी काळभोर आणि कदमवाकवस्ती ग्रामपंचायतींच्या हद्दीतील सर्व व्यवहार बंद होते. याबरोबरच पुणे सोलापूर महामार्ग सुरळीतपणे सुरू होता.
मराठा महासंघाच्या वतीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने एक निवेदन देण्यात आले आहे. मराठा आरक्षणाबाबत अध्यादेश काढून किंवा न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडून तातडीने निर्णय घ्यावा. महाराष्ट्रात जी 72 हजार नोकऱ्यांची मेगाभरती होणार आहे, ही मेगाभरती मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतरच करावी, अशा मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत. पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलिसांनी दिवसभर चोख बंदोबस्त ठेवला होता. या वेळी कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)