लोणीत खरीप पीक कर्जाचे वाटप

लोणी धामणी- आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागातील लोणी येथे श्री भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून खरीप पीक कर्ज वाटप करण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून शेत वहीवाटणीचा मार्ग मोकळा झाला आहे. भैरवनाथ सोसायटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष अशोक गणपत शिंदे, उपाध्यक्ष गुलाब गबाजी वाळुंज यांच्या हस्ते शेतकरी सभासदास कर्ज वाटप करण्यात आले. लोणी विविध कार्यकारी सोसायटीत 580 शेतकऱ्यांची खाती असून 250 शेतकऱ्यांना कृषिकर्ज वाटप करण्यात आल्याचे संस्थेचे सचिव निवृत्ती सिनलकर यांनी सांगितले. यावेळी संचालक कैलास गायकवाड, सिंधुबाई मारुती दिवटे, अशोक सिनलकर, दिनकर सिनलकर आदी उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.