लोणावळ्याच्या नुसरत परवीन शेख यांना मिसेस इंडिया इंटरनॅशनलचा ताज

लोणावळा – मलेशिया येथे नुकत्याच पार पडलेल्या मिसेस इंडिया इंटरनॅशनल सौंदर्यवती स्पर्धेच्या अंतिम फेरीत महाराष्ट्रातून एकमेव निवड झालेल्या लोणावळ्यातील नुसरत परवीन शेख यांनी बाजी मारीत विजेतेपदाचा ताज परिधान करण्याचा बहुमान पटकावला.

काश्‍मिरची कन्या व लोणावळ्याची सून अशी ओळख असलेल्या नुसरत शेख यांनी इंडिया फॅशन फेस्टिवल या संस्थेने आयोजित केलेल्या मिसेस इंडिया इंटरनॅशनल या स्पर्धेकरिता ऑनलाइन ऑडिशन दिली होती. योगायोगाने त्यांना सहभागाबाबत निमंत्रण आले. देशभरातील विविध राज्यातील दोन हजार 340 सौदर्यवतींनी या निवड चाचणीत सहभाग घेतला होता. त्यापैकी देशभरातील केवळ 10 महिलांची निवड मिसेस इंडिया इंटरनॅशनल 2018 या स्पर्धेकरिता झाली होती. नुसरत यांना प्रमाणपत्र आणि विजेतेपदाचा मुकूट डोक्‍यावर घालून सन्मानित करण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

16 वर्षांपूर्वी लग्न होऊन लोणावळ्यात आलेल्या नुसरत शेख यांना एक मुलगी व दोन मुले आहेत. तसेच आई, दोन भाऊ असा परिवार आहे. काहीतरी करुन दाखविण्याची उमेद मनात धरुन त्यांनी इंडिया फॅशन फेस्टिवलची ऑनलाईन ऑडिशन दिली व त्यांना यशाचा मार्ग सापडला. नवऱ्यापासून वेगळे राहत अत्यंत खडतर परिस्थितीत मिळवलेल्या या यशामुळे नुसरत या अशा महिलांसाठी रोल मॉडेल ठरल्या आहेत.

नुसरत म्हणाल्या, मला रॅम्प वॉक व इतर बाबीचा अनुभव नसल्याने सुरुवातीला मनात फार भीती होती. परंतु, शब्बीर अली शेख व एकता रुपानी व त्यांच्या टिमने माझ्याकडून स्पर्धेची उत्तम प्रकारे तयारी करुन घेतली. फायनल करिता देखील पूर्ण क्षमतेने तयारी केली आणि हे यश प्राप्त झाले. या यशामुळे लोणावळा शहराचे नाव आंतरराष्ट्रीय पटलावर सन्मानाने घेण्यात आले याचा मला अभिमान वाटतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)