मोदी-शहा जोडगोळीवर सोनीयांचा हल्लाबोल
नवी दिल्ली : मोदी शहा सरकारने आपली संसद आणि घटनात्मक संस्थअंची बूज कधीच ठेवली नाही. लोगोंको लडाओ… असली मुद्दे छुपाओ… हीच त्यांची भूमिका आहे, अशी घणाघाती टीका कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली. भारत बचाव रॅलीत त्या बोलत होत्या.
मोदी शहा या जोडगोळीने सुधारीत नागरिकत्व कायदा आणून भारताच्या आत्म्याचे तुकडे केले आहेत. त्यामुळेचे त्याचे पडसाद आसाम आणि ईशान्य भारतात पहायला मिळत आहेत. ज्यावेळी त्यांना एखादा कायदा लादायचा असतो, त्यावेळी ते त्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करतात. राष्ट्रपतींचा अध्यादेश काढतात. त्यांना हवे ते करतात. त्यांनी देशाचे संविधान आणि संसदेची बूज कधीच ठेवली नाही, असे त्यांनी सांगितले.
मोदी है रो मुमकीन है… महागाई, मोदी है तो मुमकीन है… बेरोजगारी, मोदी है तो मुमकीन है… चार लाख रोजगारावर कुऱ्हाड, मोदी है तो मुमकीन है… अर्थव्यवस्थेची डबघाई…. प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर भारत बचाव रॅलीत हल्ला चढवला आणि उपस्थितांनी त्याला जोरदार प्रतिसाद दिला.
नवी दिल्लीच्या रामलिला मैदानावर कॉंग्रेसच्या भारत बचाव रॅलीला देशभरात उत्तम प्रतिसाद मिळाला. या रॅलीला संबोधोत करताना प्रियांका गांधी म्हणाल्या, तुम्ही प्रत्येक बस स्टॉपवर, प्रत्येक वर्तमानपत्रात जाहीरात पाहता. मोदी है तो मुमकीन है… पण वस्तुस्थिी अशी आहे भाजपा आहे तिथे शक्य आहे… कांदा 100 रुपये किलो. भाजपा आहे तिथे शक्य आहे 45 वर्षातील उच्चांकी बेरोजगारी. भाजपा आहे तिथे शक्य आहे चार कोटी रोजगारांवर कुऱ्हाड… एखदी वीज कोसळावी तशा प्रियांका कोसळत होत्या आणि केंद्र सरकारच्या कारभाराचे अक्षरश: वस्त्रहरण करत होत्या.
आपल्या देशाची अर्थव्यवस्था आपल्याला सावरायची आहे. आर्थिक मंदीतून बाहेर पडायचे आहे. राष्ट्रीय उत्पन्न वाढवायचे आहे. महागाई रोखायची आहे. ते सोडून सरकार नागरिकत्व सुधारणा कायद्याने देशात फुटीची बिजे पेरत आहे. आपण आता गप्प बसलो तर हे सरकार राज्यघटना उद्ध्वस्त केल्याखेरीज राहणार नाही. या देशातील प्रत्येक नागरिकाने त्यांचा आवाज दाखवला पाहिजे. आम्ही आवाज दाखवला नाही तर अंधार आणि असत्याच्या गर्तेत ढकलले जाऊ. आपली राज्यघटनाही हे सत्ताधारी उद्ध्वस्त करतील, असा हल्लाबोल ही प्रियांका गांधी यांनी केला.
मी राहूल गांधी आहे राहूल सावरकर नव्हे
काल मला संसदेत माफ मागायला सांगितली. मी म्हणालो, जे सत्य आहे, त्यासाठी मी माफी मागणार नाही. सत्यासाठी माफी मागायला माझे नाव राहूल सावरकर नाही… राहूल गांधी आहे. या देशाची अर्थव्यवस्था पंतप्रधानांनी एकहाती डबघाईला आणली. जुन्या पध्दतीने राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा वेग अवघ्या अडीच टक्क्यावर आणला आहे.
मोदी हेच संकट : मनमोहनसिंग
मोदी सरकारने नागरिकांना अनेक आश्वासने दिली होती. त्यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते. दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले. ही सर्व आश्वासने खोटी निघाली आहेत. काही आश्वासने पूूर्ण करण्यात या सरकारला यश आले नाही. त्यामुळे कॉग्रेसला बळ देण्याची गरज निर्माण झाली आहे, असे माजी पंतप्रदान मनमोहनसिंग यांनी सांगितले.