लोखंडे यांनी दिले सापास जीवदान

आचरेवाडी : शेखर लोखंडे यांनी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आढळलेल्या सापास पकडून जीवदान दिले.

ढेबेवाडी, दि. 18 (वार्ताहर) – आचरेवाडी ता. पाटण येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या आवारात एक विषारी जातीचा साप सोमवारी सकाळी मुलांना दिसून आला. यानंतर शिक्षकांनी सर्पमित्र शेखर लोखंडे यांना बोलावून सापास पकडून जंगलात सोडून दिले.
न्यू इंग्लिश स्कूल डोंगरावरील माळावर वसलेले आहे. येथे बर्‍याचवेळा अशाप्रकारचे साप दिसून येतात. वाढत्या उन्हामुळे सकाळी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास शाळेसमोरील दगडी तालीजवळ काही मुलांनी साप पहिला. याची माहिती मुख्याध्यापक बी. डी. साबळे यांना दिली. त्यांनी तात्काळ शेखर लोखंडे यांना शाळेमध्ये बोलावले श्री. लोंखडे यांनी एका काठीच्या साहाय्याने पाच मिनिटात हाताने सापास पकडले व दूरच्या डोंगरांमध्ये सोडून दिले. शेखर लोखंडे यांनी अशाप्रकारे आजपर्यंत सुमारे 900 सापांना जीवदान दिले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)