सनातनला वाचवण्यासाठी ‘निर्दोषांचा’ बळी !- प्रकाश आंबेडकर

मुंबई: भीमा कोरेगाव दंगलीनंतर पोलिसांनी अनेक जणांना अटक केली. मंगळवारी पोलिसांनी कथित नक्षल समर्थकांच्या घरावर छापे मारले होते. मात्र भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडक यांनी ही कारवाई लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी केली आहे, असा आरोप केला आहे.

पुण्यातील एल्गार परिषदेनंतर भिमा-कोरेगाव येथे दंगल पेटली होती. दरम्यान, राज्यात अनेक ठिकाणी हिंसक घटना घडल्या होत्या. त्यामुळे एल्गार परिषदेशी निगडीत असल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी कथित नक्षल समर्थकांच्या घरावर छापे मारले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रकाश आंबेडकर म्हणाले, सनातनच्या लोकांविरूद्ध सुरू झालेल्या कारवाईवरून लक्ष विचलित करण्यासाठीच मंगळवारी देशभरात छापासत्र आयोजित करण्यात आले आहे.

कोरेगाव भीमा दंगलीच नक्षल कनेक्शन शोधण्यासाठी पुणे पोलिंसानी आज मुंबई, ठाणे मध्ये ठिकठिकाणी छापे टाकले आहेत. तसेच दिल्ली, हैदराबाद, रांची आणि हरियाणा या शहरांमध्ये देखील हे छापासत्र सुरू आहे.

महाराष्ट्र पोलिसांनी हरियाणात देखील छापा टाकला आहे. मानवधिकार कार्यकर्ता आणि नॅशनल लाॅ काॅलेजच्या प्राध्यपिका डाॅ. सुधा भारद्वाज यांना मंगळवारी सकाळी सात वाजता फरिदाबाद येथील चार्मवूड विलेज सोसायटीमधून महाराष्ट्र पोलिसांनी अटक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)