लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडे सक्षम उमेदवार ; गटबाजीला थारा न देता बेरीज करणार

राजेंद्र फाळके : गटबाजीला थारा न देता बेरीज करणार

नगर: नगर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडेच राहणार आहे. अर्थात आघाडीचा निर्णय पक्षश्रेष्ठीच घेणार आहेत. त्यावर मी भाष्य करू शकत नाही; पण जोपर्यंत निर्णय होत नाही, तोवर हा मतदारसंघ पक्षाकडे राहणार आहे. लोकसभेसाठी पक्षाकडे सक्षम व सर्वांच्या मनातील उमेदवार आहे. त्यामुळे अन्य पक्षातून उमेदवार आयात करण्याचा प्रश्‍न उद्‌भवत नाही, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी व्यक्‍त केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

फाळके यांनी मंगळवारी दैनिक प्रभातच्या नूतन कार्यालयास सदिच्छा भेट दिली. त्या वेळी फाळके यांनी प्रभात टीमबरोबर संवाद साधला. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात आघाडीचा निर्णय जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत दोन्ही जागांवर पक्षाचा दावा राहणार आहे. नगर लोकसभा मतदारसंघ पक्षाकडे राहणार आहे. यापूर्वी या मतदारसंघात पक्षाचा उमेदवार विजयी झालेला आहे. दोन वेळा पराभव झाला असला, तरी हा मतदारसंघ पक्षाकडे राहणार आहे. त्याचे कारण या मतदारसंघात कॉंग्रेसचा एकही आमदार नाही; मात्र राष्ट्रवादीचे दोन आमदार आहे. कॉंग्रेस कशाच्या बळावर ही जागा मागणार, हा प्रश्‍न आहे. पक्षाकडे सक्षम व सर्वांना मान्य असणारा उमेदवार आहे. त्यामुळे अन्य पक्षांतील उमेदवार आयात करण्यात येणार नाही, असा दावा फाळके यांनी केला.

ते म्हणाले, की येत्या एक महिन्यात बुथ कमिट्या स्थापन करण्यात येणार आहेत. पंधरा दिवसांत जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात येईल. बुथ कमिट्या यापूर्वीदेखील होत्या; परंतु त्या व्यक्‍तीकेंद्रीत होत्या. आता युवक पिढीला बदला हवा आहे. त्यानुसार बुथ कमिट्या करण्यात येतील. एक बुथ तेथे 15 कार्यकर्ते अशी रचना आहे. सहकाराच्या माध्यमातून राष्ट्रवादी व कॉंग्रेसकडे ही बुथ रचना यापूर्वीच होती; पण आज राज्य व केंद्रातील भाजप सरकारने पक्षाच्या शक्‍तीस्थळावरच घाला घातला आहे. त्यामुळे सहकारी संस्था मोडकळीस आल्या आहेत. दूध संघ, सोसायट्या, जिल्हा बॅंका, साखर कारखाने अडचणीत आले आहेत. असे असले तरी पक्ष संघटना वाढविण्यासाठी बुथ कमिट्या स्थापन करण्यात येत आहे. येत्या महिन्याभरात सर्व 12 विधानसभा मतदारसंघात बुथ कमिट्या स्थापन केल्या जाणार आहेत. त्यादृष्टीने आता कामकाज होत आहे.”

राष्ट्रवादीमध्ये गटबाजी आहे, हे कबूल करतो. अर्थात गटबाजी ही प्रत्येक पक्षात असते. पक्ष मोठा झाला, की गटबाजी-वाद होतात; पण गटबाजीला थारा न देता पक्ष वाढविण्यावर आपला भर राहील. त्यासाठी बेरीज करण्याचे धोरण राबविण्यात येणार आहे. तालुक्‍यातील नेत्यांना विश्‍वासात घेऊन त्यांची ताकद वाढविण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. पक्षापासून दूर गेलेल्या नेते व कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करून त्यांना पुन्हा पक्षात आणणार आहे. त्यासाठी काही बैठका झाल्या आहेत. जुन्या-नव्यांचा मेळ घालून संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न आहे. या प्रयत्नाला जिल्ह्यातील सर्व नेते माझ्याबरोबर राहणार आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत गेलेल्या जागा पुन्हा पक्षाकडे आणण्यासह नव्याने जागा मिळविण्याचा प्रयत्न राहणार आहे. भाजप सरकारविरोधात आता रस्त्यावर उतरणार असून तीव्र संघर्ष केला जाईल. सरकारचे चुकीचे निर्णय व धोरणामुळे सर्व स्तरात सरकारबद्दल नाराजी आहे. त्याचा प्रचार व प्रसार करून सरकारच्या विरोधात रान पेटविण्यात येणार असल्याची माहिती फाळके यांनी दिली.

लेटरहेड वापरणारे पदाधिकारी नको

पक्षाची जिल्हा कार्यकारिणी पंधरा दिवसांत तयार करणार आहे. केवळ लेरहेड वापरणारे पदाधिकारी नकोत, असा माझा प्रयत्न राहणार आहे. पक्षाचे काम करणाऱ्या, वेळ देणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार आहे. काम न करणाऱ्यांना पदावरून दूर करण्यात येणार असल्याचा इशारा फाळके यांनी दिली. जे काम करणार नाहीत, त्यांच्याबद्दलचा अहवाल दर महिन्याला श्रेष्ठींना पाठविण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)