लोकसभेत वादळी चर्चा…

दिल्ली – आसामातील नागरीकांच्या यादीवरून विरोधी सदस्यांनी अपेक्षेप्रमाणे सरकारवर जोरदार टीका केली. तृणमुल कॉंग्रेस, कॉंग्रेस, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट व समाजवादी पक्षाच्या सदस्यांनी या यादीवर आक्षेप घेताना नमूद केले की सरकारने जाहीर केलेल्या या यादीमुळे मानवी हक्क आणि लोकशाही हक्कच दावावर लागले आहेत. त्यावर निवेदन करताना गृहमंत्री राजनाथसिंह म्हणाले की हा अत्यंत संवेदनशील विषय असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी यावर जबाबदारीने वक्तव्ये करावीत.

ही यादी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तयार करण्यात आली असून त्यात सरकारचा काही एक सहभाग नाही असे त्यांनी स्पष्ट केले. तथापी सरकारतर्फे करण्यात आलेले निवेदन समाधानकारक नसल्याचा आरोप करून विरोधी सदस्यांनी सभात्याग केला. तृणमुल कॉंग्रेसने या विषयावरून सरकारच्या विरोधात तहकुबी सुचनाही मांडली. पण सभापतींनी ती स्वीकारली नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)