#लोकसभा2019 : भाजपच्या आणखी एका नेत्याची जीभ घसरली

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहेत. राजकीय वातावरण चांगलेच आहे. राजकीय पक्षातील नेते मिळेल त्या शब्दात एकमेकांवर आरोप करत आहेत. भाजपकडून भोपाळमधून उमेदवारी जाहीर झालेल्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर, आता भाजपचे गुजरात राज्यातील मंत्री गणपत वासवा यांनी देखील असेच काही वक्तव्य केले आहे.

गणपत वासवा यांनी एका प्रचार सभेत बोलताना, जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी उभे असतात, तेंव्हा असे दिसते की गुजरातचा सिंह उभा आहे. आणि जेव्हा राहुल गांधी उभे असतात, तेंव्हा कुत्र्याचे पिल्लू असल्यासारखे दिसत असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे. पुढे बोलताना हे कुत्र्याचे पिल्लू पाकिस्तान ‘रोटी’ देत असेल तर, तेथे जाईल आणि जर चीनने ‘रोटी’ दिली तर तिथेही जाईल, असे गणपत वासवा यांनी म्हंटले आहे.

 

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.