लोकसभा निवडणूक आघाडी करून लढवणार – पवार

कोल्हापूर – कॉंग्रेस-राष्ट्रवादी एकत्रित निवडणुकीला सामोरे जाणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्या चर्चा संसदेच्या पावसाळी अधिवेशनानंतर सुरू होणार आहे. कॉंग्रेसच्या चर्चेची सूत्रे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे आणि राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडे राहतील, तर राष्ट्रवादीकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल यांचा सहभाग असणार आहे.

जागावाटप करताना काही अडचण निर्माण झाल्यास दोन्ही पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अंतिम निर्णय घेतील. पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असावा याची भूमिका प्रत्येक पक्ष घेऊ शकतो. कॉंग्रेसने राहुल गांधी यांचे नाव पुढे केले असले तरी तो त्या पक्षाच्या धोरणाचा भाग आहे. अंतिम निर्णय निवडणुकीनंतर होईल. 1975 साली निवडणुकीनंतर जनता दल अस्तित्वात येऊन मोरारजी देसाई पंतप्रधान झाले होते, याचा दाखला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)