लोकमान्य मेडिकल रिसर्चला भेट मिळाली ऍम्बुलन्स

कॅन्सर रुग्णांसाठी अद्ययावत ऍम्ब्युलन्स्‌ प्रदान सोहोळा

पिंपरी – येथील लोकमान्य मेडिकल रिसर्च सेंटर ही संस्था गेली वर्षे वैद्यकीय संशोधन क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. विशेषत: कर्करोग आणि त्यावरील इंटिग्रेटेड थेरपी संबंधी प्रयोग व संशोधन या प्रमुख कार्यासाठी लोकमान्य मेडिकल रिसर्च सेंटर विख्यात आहे. नुकताच जागतिक कॅन्सर सप्ताह समाप्तीच्या निमित्ताने “लोकमान्य मेडिकल रिसर्च सेंटर, चिंचवड येथे एका कार्यक्रमात यांना पुण्यातील एका अग्रगण्य मल्टिनॅशनल कंपनी यॉर्क ट्रान्स्पोर्ट इक्विपमेंटस्‌ इंडिया प्रा. लि. यांचेकडून समारंभपूर्वक एक अत्याधुनिक रुग्णवाहिका भेट देण्यात आली. ही रुग्णवाहिका कॉर्पोरेट सोशल रिअस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत प्रदान करण्यात आली.

सीएफ्‌ओ-यॉर्कचे प्रमुख बिकाश पहाडी यांच्या हस्ते ऍम्ब्युलन्सची चावी “लोकमान्‌’ चे विश्‍वस्त डॉ. विक्रम घोले यांनी स्वीकारली. याप्रसंगी यॉर्कचे सेफ्टी ऑफीसर श्री राहुल गायकवाड तसेच “लोकमान्य’तर्फे ग्रुप सीईओ सुनील काळे, डॉ. विशाल क्षीरसागर आदी सदस्य उपस्थित होते. सोहोळ्याचे सूत्रसंचालन लोकमान्य मेडिकल रिसर्चचे संचालक श्रीनिवास पत्तार यांनी केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.