लोकजनशक्ती पक्षाने वाढवली भाजपची डोकेदुखी

सरकार विरोधी आंदोलनात सहभागी होण्याचा दिला इशारा
नवी दिल्ली – शिवसेना, तेलगु देसम पार्टी या पक्षांच्या पाठोपाठ आता लोकजनशक्ती पक्षानेही भाजपची डोकेदुखी वाढवली आहे. राष्ट्रीय हरित लवादाच्या अध्यक्ष पदी नेमण्यात आलेल्या न्या गोयल यांची हकालपट्टी करावी या मागणीसाठी या पक्षाने येत्या 9 ऑगस्टला दिल्लीत होणाऱ्या दलितांच्या सरकार विरोधी निदर्शनांमध्ये सहभागी होण्याचा ईशारा दिला आहे. या पक्षाचे नेते रामविलास पासवान हे सध्या मोदींच्या सरकारमध्ये केंद्रीय मंत्री आहेत. त्यांचे खासदार चिरंजीव चिराग पासवान यांनी मोदी सरकारला हा इशारा दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयातील निवृत्त न्यायाधिश ए. के. गोयल यांची मोदी सरकारने राष्ट्रीय हरित लवादाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दलितांसाठीचा ऍट्रॉसिटी कायदा शिथील करण्याचा निर्णय अलिकडेच दिला आहे. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या ज्या खंडपीठाने दिला आहे त्या खंडपीठात गोयल यांचाही समावेश होता त्यामुळे लोकजनशक्ती पक्षाचे खासदार चिराग पासवान यांचा त्यांच्या नियुक्तीला आक्षेप आहे. त्यांची त्वरीत हकालपट्टी करावी अशी आमच्या पक्षाची मागणी आहे. ती पुर्ण न झाल्यास आम्ही सरकारच्या विरोधात पुढील महिन्यात दलितांनी जी निदर्शने आयोजित केली आहेत त्यात सहभागी होऊ असा इशारा चिराग पासवान यांनी दिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या मागणीला त्यांचे वडिल केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचा विरोध आहे किंवा कसे याचे स्पष्टीकरण झालेले नाही. तथापि आमच्या पक्षाने मोदींच्या नेतृत्वाखालील पक्षाला मुद्‌द्‌यांवर आधारीत पाठिंबा दिला आहे आम्ही सरकारच्या मागे फरफटत जाणार नाही असेही चिराग पासवान यांनी स्पष्ट केले आहे. पण त्याचवेळी आम्ही तेलगु देसम प्रमाणे सरकारमधून बाहेर पडणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)