लोअर परेल पुलावर शिवसेना – मनसेत हाणामारी

मुंबई – मुंबईतील लोअर परेलमध्ये असलेल्या उड्डाणपुलावर शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीचा प्रकार घडला. आपल्या पाहणी दौऱ्यात मनसे कार्यकर्त्यांनी घुसखोरी केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. दरम्यान, पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करत प्रकरण मिटविले.

वरळी भागातील शिवसेना आमदार सुनिल शिंदे आणि मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी लोअर परेलच्या उड्डाणपुलावर गेले होते. त्यावेळी दोघांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना धक्काबुक्की-शिवीगाळ केली. त्यानंतर उड्डाणपुलावरच दोन्ही गटाकडून तुफान राडा करत हाणामारी करण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या उड्डाणपुलाची पाहणी करण्यासाठी महापालिका आयुक्त, रेल्वे अधिकारी जाणार होते. त्यावेळी आमदार सुनिल शिंदेही उड्डाणपुलाची पाहणी करण्यासाठी गेले. मात्र, अरुंद वाट असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. याप्रसंगी मनसेच्या कार्यकर्त्यांनी आपल्या दौऱ्यात घुसखोरी केल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे.

दरम्यान, लोअर परेलचा रेल्वे पूल मंगळवारपासून वाहतूक आणि पादचाऱ्यांसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे लोअर परेल रेल्वे पुलाजवळ नागरिकांची गर्दी होत आहे. लोअर परेल स्थानकातून बाहेर पडण्यासाठी फक्त एक पूल उपलब्ध आहे. पण तो लहान आहे. पूल उतरल्यावर खाली चिंचोळी गल्ली आहे, त्यातच रस्त्यावर बाईक पार्क असतात. तिथून बाहेर पडायला प्रवाशांना 20 ते 25 मिनिट लागत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)