लैंगिक शिक्षणाचे धडे देणाऱ्या शिक्षकाला पालकांनी चोपले

परिसर अभ्यासाऐवजी पाचवीतील विद्यार्थ्यांना चक्‍क लैंगिक शिक्षण
कोपरगाव – इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांना परिसर अभ्यास भाग 1 शिकविण्याऐवजी शिक्षकाने चक्‍क लैंगिक शिक्षणाचा धडाच शिकविला. हा धडा विद्यार्थिंनी घरी पालकांना विचारल्यानंतर पालक संप्तत झाले. त्यांनी थेट शाळा गाठून त्या शिक्षकाला चांगलाच चोप दिला. त्या शिक्षकाने माफी मागितल्यानंतर त्याला सोडून देण्यात आले. तालुक्‍यातील मुर्शतपुर येथील जिल्हा परिषदेत शाळेत हा प्रकार आज दुपारी उघडकीस आला.
तालुक्‍यातील मुर्शतपुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता 5 वीच्या विद्यार्थ्यांना परिसर भाग 1 मधील आहार विहार या विषयावर धडा शिकविताना एका शिक्षकाने लैंगिक शिक्षणाचा धडा सुरू केल्याने वर्गातील विद्यार्थी आवाक झाले. काही विद्यार्थिंनी या शिक्षकाचा धडा घरामध्ये पालकांना विचाराला. त्यामुळे पालकामध्ये संतापाची लाट उसळली. पाचवीतील विद्यार्थिंना अशा शब्दात शिक्षण देणाऱ्या शिक्षकाला जाब विचारण्यासाठी पालकांनी थेट शाळा गाठली. परंतु तो शिक्षक आठ दिवस रजेवर गेला होता. अखेर आठ दिवसानंतर तो शिक्षक आज शाळेत आल्यानंतर पालकांनी वर्गात जावुन धुलाई करीत जाब विचारला.महिला पालकांनी या शिक्षकाला चांगलाच चोप दिला.
दरम्यान, या घटनेची माहिती तालुक्‍यात वाऱ्यासारखी पसरली. गटशिक्षणाधिकारी शबाना शेख बैठकीला गेल्याने त्यांना झालेला प्रकार काही वेळात समजला.परंतु “तेरी भी चुप, मेरी भी चुप’ या प्रमाणे काही न झाल्यासारखे सुरू होते.शाळेच्या मुख्याध्यापिकांनी त्या शिक्षकाला पाचवीच्या वर्गातुन बडतर्फ करून चौथीच्या वर्गाला टाकले. प्रसिध्दी माध्यमापासुन अलिप्त राहण्याचा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सल्ला शिक्षकांसह मुख्याध्यापकांनी पाळला.
लैंगिक धडे देणारा हा शिक्षक 8 ऑगष्ट 2000 पासुन सेवेत आहे. 2012 पासुन कोपरगाव तालुक्‍यातील ब्राम्हणगाव, साकरवाडी, डांगेवाडी व 29 मे 2018 पासुन मुर्शतपुर येथे शिक्षक म्हणुन कार्यरत आहे. मुर्शतपुर येथे 1 ली ते 7 वी पर्यंत शाळा आहे. मुला मुलीसह एकुण पट 186 आहे. 4 महिला शिक्षिका तर 4 पुरूष शिक्षक आहेत. या शाळेतील महिला मुख्याध्यापकांनी योग्य भुमिका बजावणे आवश्‍यक आहे. गटशिक्षणाधिकारी महिला आहे. मुख्याध्यापिका महिला आहे. पालकांनी तक्रारी करूनही त्याकडे कानाडोळा करण्याचे काय कारण आहे. अखेर आठ दिवसाच्या कालावधीनंतर पालकांनीच त्या शिक्षकाला चांगला धडा शिकविला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)