लेवा समाजाच्या मेळाव्याचे आयोजन

पिंपरी – समता भ्रातृ मंडळ व जळगाव जिल्हा लेवा समाज यांच्या विद्यमाने महाराष्ट्र दिनानिमित्त येत्या मंगळवारी (दि. 1) समाजाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रमुख पाहुणे म्हणून जळगावचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, आमदार महेश लांडगे, रमेश पाटील, डॉ. प्रमोद महाजन उपस्थित राहणार आहेत. निगडी येथील भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल सभागृह येथे हा मेळावा होणार आहे. यावेळी मेळाव्याबरोबरच कामगार दिन, महाराष्ट्र दिन, समता भ्रातृ मंडळ व जळगांव जिल्हा लेवा समाज मंडळाचा वर्धापन दिन, वार्षिक सर्वसाधारण सभा एकत्रितपणे होणार आहे.

कार्यक्रमात सेवानिवृत्त, ज्येष्ठ नागरीक व वारकरी यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी दुपारी तीन ते रात्री साडेआठ यावेळेत सांस्कृतीक कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमाला समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समता भ्रातृ मंडळ व जळगाव जिल्हा लेवा समाज यांच्या वतीने करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)