शिवनेरी- श्रीक्षेत्र लेण्याद्री (ता. जुन्नर) येथे गणेश जयंती उत्सवानिमीत्त शुक्रवारी (दि. 8) दुपारी 10 ते 12 हभप नामदेव महाराज वाळके (वेळेश्वर) यांचे गणेश जन्माचे कीर्तन, तसेच दुपारी 12 ते 6 भव्य संगीत भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गोविंद मेहेर व उपाध्यक्ष कैलास लोखंडे यांनी दिली. भजन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या भजनी मंडळास 17 हजार 111 रुपये, द्वितीय क्रमांकास 15 हजार 111, तृतीय क्रमांकास 12 हजार 111 आणि चतुर्थ क्रमांकांच्या भजनी मंडळास 9 हजार 111 समस्त ग्रामस्थ मंडळी गोळेगांव, श्री लेण्याद्री ग्रामविकास मंडळ मुंबई (गोळेगांव) व श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्ट , गोळेगांव (जुन्नर) यांच्याकडून बक्षीस देण्यात येणार आहे. भजन स्पर्धेत भाग घेणारे मंडळास प्रवेश फी आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा