लेखापाल घाटपांडे यांना जामीन : तर, अभियंता नेवासकर यांच्या जामिनावर सोमवारी सुनावणी

 डीएसके फसवणूक प्रकरण 


विशेष न्यायाधीश आर.एन.सरदेसाई यांचा आदेश

पुणे – ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांचे सनदी लेखापाल सुनील घाटपांडे यांना विशेष न्यायाधीश आर. एन. सरदेसाई यांनी जामीन मंजुर केला आहे. पुराव्यामध्ये हस्तक्षेप करायची नाही, न्यायालयाच्या परवानगीशिवाय न्यायिक क्षेत्र सोडून जायचे नाही, दर सोमवारी सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजरी लावणे, या अटींवर 1 लाख रुपयांच्या वैयक्तीक जातमुचलक्‍यावर हा जामीन मंजुर करण्यात आला आहे. दरम्यान अभियंता राजीव नेवासकर यांच्या जामिनावर सोमवारी (दि. 30 जुलै) सुनावणी होणार आहे.
घाटपांडे यांच्या वतीने ऍड. एस.के.जैन, ऍड. अमोल डांगे यांनी बाजू मांडली. तर नेवासकर यांच्या वतीने ऍड. रोहन नहार यांनी न्यायालयात बाजू मांडली. दोघांना जामीन देण्याची मागणी बचाव पक्षातर्फे करण्यात आली आहे. तर सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी बाजू मांडत दोघांच्या जामिनाला विरोध केला होता. मात्र, बचाव पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरत न्यायालयाने घाटपांडे यांना जामीन मंजुर केला. तर, नेवासकर यांच्या जामिनावर सोमवारी सुनावणी होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)