लेखक प्रताप गंगावणे यांना सातारा भूषण पुरस्कार

सातारा, दि. 28 (प्रतिनिधी)-
येथील रा. ना. गोडबोले सार्वजनिक ट्रस्ट व सातारकर नागरिकातफें प्रतिवर्षी दिला जाणारा मानाचा सातारा भूषण पुरस्कार 2018 सालासाठी गेली 25 वर्षे नाटक, चित्रपट व दूरदर्शन या तिन्ही माध्यमातून कसदार , प्रभावी लेखनाने आपली नाममुद्रा प्रस्थापित करणारे सुप्रसिध्द साहित्यिक प्रताप गंगावणे यांना जाहीर करण्यात आला आहे.
दुरवाहिन्यांवरील मालिका लेखक म्हणून सर्वज्ञात आहेत. कालाय तस्मै नम:, राजा शिवछत्रपती, बाजीराव मस्तानी, पेशवा बाजीराव व सध्या प्रचंड लोकप्रिय झालेली, स्वराज्य रंक्षक संभाजी.. या मेगा सिरीयल खूप नावाजल्या जाऊन घराघरात पोहोचल्या. वीर शिवाजी ही 260 भागांची हिंदी सिरीयलही त्यांच्याच लेखणीतून साकारली होती.
त्यांना उत्कृष्ट चित्रपट लेखन व नाट्य लेखनाचे राज्य व केंद्र सरकारचे अनेक पुरस्कारांबरोबर म.टा. सन्मान, चित्रकर्मी, कलारंग, भाउ फक्कड, अहिल्याबाई गौरव अश्‍या असंख्य पुरस्कारांनी आजपर्यत गौरवले गेलेआहे. प्रतिभा , प्रज्ञा, जिद्द व प्रयत्न यांच्या बळावर त्यांनी केलेली वाटचाल अनेक युवक,साहित्यिक व रंगकर्मीर्ना प्रेरणादायी ठरणारी आहे.
गोडबोले ट्रस्टतर्फे 1991 पासून विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणार्या सातारा जिल्ह्यातील सुपत्रास सातारा भुषण पुरस्काराने गौरविले जाते. पुरस्काराचे यंदा 28 वे वर्षं असून यापुर्वी तर्कंतीर्थं लक्ष्मण शास्त्री जोशी, छोटा गंधर्व, प्रा. शिवाजीराव भोसले, ह. भ. प. बाबामहाराज सातारकर,डॉ. नीळकंठराव कल्याणी, शाहीर साबळे, शेतकरी संघटनेचे शरद जोशी, सविता प्रभुणे, डॉ.नरेंद्र दाभोलकर आदी मान्यवरांना गौरविण्यात आले आहे.
यावर्षी ज्येष्ठ संशोधक डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर, रंगकर्मी बाळकृष्ण शिंदे आणि ट्रस्टचे विश्वस्त अशोक ,डॉ. अच्युत व उदयन गोडबाले यांच्या निवड समितीने ही निवड केली आहे. रुपये 25 हजार व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप असून तो लवकरच समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहेअशी माहिती गोडबोले ट्रस्टचे अध्यक्ष अरुण गोडबोले यांनी दिलीआहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)