लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या विवाहित महिलेलाही पोटगीचा हक्क – उच्च न्यायालय

मुंबई : एक विवाहित महिला परपुरूषासोत 15 वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होती, तिला पोटगीचा हक्क असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल नुकताच मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. पोटगीसाठी या महिलेने केलेला दावा सत्र न्यायालयाने फेटाळला होता, मात्र उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निकाल बाजुला ठेवत या महिलेला पोटगी मिळायला हवी असा निकाल दिला आहे.

एका इंग्रजी वतर्मानपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. न्यायाधीश भारती डांगरे यांनी घरामध्ये महिलांवर होणाऱ्या हिंसेसंदर्भात हा निकाल दिला आहे.  महिला या पुरूषाबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये गेली 15 वर्षे राहत होती, त्याच्या बरोबर पत्नीसारखे सगळे खर्च भागवत होती आणि तिची पहिल्या पतीपासून झालेली मुलेही त्याला वडिल संबोधित होती. घरगुती हिंसाचाराचा संबंध व त्यासंदर्भातील कायदेशीर लाभाचा विचार करताना या जोडप्याचे संबंध विवाहासारखेच होते असा निष्कर्ष न्यायालयाने काढला आहे.

या पत्नीचा 20 वर्षांपूर्वी विवाह झाला होता, परंतु नवरा तिला सोडून गेला आणि त्यानंतर ती या दुसऱ्या पुरूषाबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आपल्या मुलांसह राहत होती. मात्र, 15 वर्षांनतर त्याच्याशी झालेल्या भांडणानंतर 2012 मध्ये तिने घर सोडले आणि पोटगीसाठी दावा केला. सत्र न्यायालयाने तिचे म्हणणे ग्राह्य मानले जे सत्र न्यायालयाने फेटाळले. मात्र, आता अपिलामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने तिचा पोटगीचा हक्क मान्य केला आहे. एका घरामध्ये केवळ एकत्र राहणे यास विवाहाचा दर्जा देता कामा नये असा दावा त्या पुरूषाच्या वकिलाने केला होता, जो उच्च न्यायालयाने फेटाळून लावला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)